Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; हत्येच्या आदल्या दिवशी व्यक्त केली होती भीती

संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या नव्या पुराव्यानंतर वाल्मिक कराड आणि इतर आरोपींविरोधातील गुन्हा अधिक गंभीर होत चालला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 12, 2025 | 04:27 PM
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; हत्येच्या आदल्या दिवशी व्यक्त केली होती भीती
Follow Us
Close
Follow Us:

बीड:  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज  बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी  मोठा खुलासा झाला आहे. हत्या होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ८ डिसेंबर रोजी, संतोष देशमुख यांनी पत्नी अश्विनी देशमुख यांच्याशी बोलताना “वाल्मिक कराड आणि त्याची लोकं मला मारून टाकतील” अशी भीती व्यक्त केली होती, असे दोषारोपपत्रातील त्यांच्या जबाबावरून उघड झाले आहे. या घटनेनंतर ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या नव्या खुलाशामुळे या प्रकरणात आरोपींवरचा दबाव आणखी वाढणार आहे.

८ डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांनी पत्नीला आपल्या हत्येची शक्यता व्यक्त केली. तर ९ डिसेंबरला त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. असं संतोष देशमुख यांच्या पत्नीने दिलेल्या दोषारोपपत्रातील जबाबातून हा महत्त्वाचा तपशील उघड झाला आहे.  या नव्या पुराव्यानंतर प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता असून, आरोपींवरील खटल्याची सुनावणीला अधिक गंभीर वळणावर जाऊ शकते, असं घेऊ शकते.

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण सुनावणी; जिल्हा सत्र न्यायालयात नेमकं काय झालं?

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नव्या खुलाशांमुळे प्रकरण अधिक गंभीर होत चालले आहे. ७ आणि ८ डिसेंबरला घडलेल्या घटनांचा उल्लेख संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबात केला आहे, जो सीआयडी तपास अधिकारी किरण पाटील यांनी नोंदवून घेतला.

 ७ डिसेंबरला नेमकं काय घडलं?

  • विष्णू चाटे याचा संतोष देशमुख यांना फोन आला
  • फोनवर तो म्हणाला, “तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती. तुला लय जड जाईल. तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही.”
  • या धमकीमुळे संतोष देशमुख तणावात होते.

 ८ डिसेंबरला काय घडलं?

  • संतोष देशमुख यांनी पत्नीला सांगितले, “वाल्मिक कराड आणि त्याची लोकं मला मारून टाकतील.”
  • ही भीती त्यांनी पत्नी अश्विनी देशमुख यांच्यासमोर स्पष्टपणे व्यक्त केली होती.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा ट्रेन हल्ला चीनचा विनाशाचा संकेत? नेमका संबंध काय?

९  डिसेंबरला  संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या नव्या पुराव्यानंतर वाल्मिक कराड आणि इतर आरोपींविरोधातील गुन्हा अधिक गंभीर होत चालला आहे. विष्णू चाटेचा फोन आणि संतोष देशमुख यांनी व्यक्त केलेली भीती हे महत्त्वाचे धागेदोरे ठरणार असून, सीआयडी तपासादरम्यान आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच्या शेवटच्या संभाषणाचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी दिलेल्या जबाबानुसार, संतोष देशमुख यांनी आपल्याला संभाव्य हत्येबाबत इशारा दिला होता.

संतोष देशमुख आणि त्यांच्या पत्नीमधील शेवटची चर्चा (८ डिसेंबर)

पत्नी अश्विनी देशमुख यांनी त्यांना धीर दिला आणि पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्यावर संतोष देशमुख यांनी उत्तर दिले:”तुला माहित नाही, तो वाल्मिक कराड गुंड आहे. त्याची मोठ्या राजकीय नेत्यांसोबत उठबस आहे. तो आणि त्याची लोकं मला मारून टाकतील.” हीच संतोष देशमुख आणि त्यांच्या पत्नी यांच्यातील शेवटची प्रत्यक्ष चर्चा ठरली.

प्रकरण आणखी गंभीर; तपास वेगाने सुरू

हा खुलासा झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधातील संशय अधिक बळकट झाला आहे. संतोष देशमुख यांनी स्वतःच्या हत्येची शक्यता व्यक्त केली होती, मात्र त्यांच्या भीतीकडे दुर्लक्ष झाले का? त्यांना योग्य संरक्षण मिळाले असते तर ही घटना टाळता आली असती का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सीआयडी आणि पोलिस तपास या महत्त्वाच्या जबाबाच्या आधारे पुढील पावले उचलतील, आणि आरोपींविरोधातील कारवाई किती जलद होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Shocking revelation by santosh deshmukhs murdered wife fear was expressed the day before the murder nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • Santosh Deshmukh Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.