बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील न्यायालयात उपस्थित होते. या खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, आरोपींवरील कारवाई कशी होईल, यावर पुढील न्यायप्रक्रिया अवलंबून असेल. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात झालेल्या पहिल्या सुनावणीदरम्यान सर्व आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे हजर करण्यात आले.
🔹 बचाव पक्षाने डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणी केली.
🔹 आरोपींचे जबाब नोंदवले गेले नसल्याचा मुद्दा आरोपींचे वकील राहुल मुंडे यांनी मांडला.
🔹 वाल्मिक कराड यांच्यावतीने वकील विकास खाडे यांनी बाजू मांडली.
🔹 सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी देखील आपला युक्तिवाद सादर केला.
रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता वाहनचालकांची होणार ‘ड्रग्ज’ सेवन तपासणी
🔸 सरकारी पक्ष 26 मार्च रोजी आपले म्हणणे मांडणार आहे.
🔸 न्यायालयाने पुढील सुनावणी 26 मार्च रोजी ठेवली आहे.
सुनावणीनंतर वाल्मिक कराड यांचे वकील विकास खाडे यांनी ब्लॅक गॉगल घालून माध्यमांशी संवाद साधला, त्यामुळे या प्रकरणातील राजकीय आणि कायदेशीर घडामोडींवर अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे.
होळीच्या साफसफाईदरम्यान रद्दीसह ‘ही’ वनस्पती काढा घराबाहेर,