नवी दिल्ली : श्रद्धा वालकर (Shraddha walkar Murder Case) हत्या प्रकरणी रोज नवी नवी माहिती समोर येत आहे. श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांकडे आफताबविरोधात तक्रार दाखल केल्याच नुकतच सांगण्यात आलं. तर, या प्रकरणी आता पुन्हा नवी माहिती समोर आली आहे. आफताब श्रद्धाला सिगारेट चटके देत होता असा धक्कादायक खुलासा तिच्या मित्राने केला आहे.
रजत शुक्ला असं तिच्या कॉलेज फ्रेंडचं नाव असून त्याने ही माहती पोलिसांनी दिल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रजत शुक्लाने सांगितलं की, आफताब पूनावाला श्रद्धाला सिगारेटचे चटके द्यायचा. मात्र, तीला नेहमी ‘दुसरी संधी’ द्यायच्या नावाखाली पोलिस तक्रार देण्याचे टाळत होती.
[read_also content=”आफताब पूनावालाच्या फ्लॅटमधून पोलिसांनी 5 चाकू केले जप्त https://www.navarashtra.com/crime/police-seized-5-knives-from-aftab-poonawalas-flat-nrps-348122.html”]
आफताबसोबत रिलेशनमध्ये असताना श्रद्धाने स्वतःला तिच्या कुटुंबापासून आणि तिच्या सर्व मित्रांपासून अंतर ठेवून वागायला सुरुवात केली होती. आफताबने तिच्या पाठीवर सिगारेटचे चटके दिल्याची बाब 2021 मध्ये श्रद्धाने तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला सांगितली होती. हे ऐकून आम्हाला वाईट वाटले होते, तो म्हणाला. हे ऐकल्यानंतर तिच्या मैत्रिणींनी आफताबची भेट तिच्याशी अशाप्रकारे न वागण्याची तंबी दिली होती तसेच त्याचे त्याची जर वागणूक अशीच राहिली तर पोलिस तक्रार करण्याची धमकी दिली होती असेही त्याने सांगितले. नुकतचं श्रद्धाचा मारेकरी आरोपी आफताबने तिची हत्या केल्याची कबुली कोर्टाला दिली. तर दुसरीक़डे पोलीस तपासात अजूनही अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. आता पोलिसांना तपासादरम्यान आरोपी आफताब पूनावालाच्या फ्लॅटमधून 5 चाकू आढळून आले आहेत.