आफताबसोबत रिलेशनमध्ये असताना श्रद्धाने स्वतःला तिच्या कुटुंबापासून आणि तिच्या सर्व मित्रांपासून अंतर ठेवून वागायला सुरुवात केली होती. अशीही माहिती तिच्या मित्राने दिली.
आफताबने यापूर्वीही श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केला होता. 23 नोव्हेंबर 2020 रोजी त्याने मुंबईत राहताना श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी श्रद्धाने नालासोपारा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.