मुंबई : कांदिवली परिसरात एका १२ वर्षीय मुलाने मोबाईल वापरू दिला नाही, म्हणून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आई-वडिलांच्या सतर्कतेमुळे मुलाचे प्राण वाचवण्यात यश आले(The 12-year-old boy was strangled in front of his parents as he was not allowed to use his mobile phone).
आई-वडिलांनी मोबाईल हिसकावून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओरडा दिला. त्यामुळे मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले. मुलाने गळफास घेतल्याचे लक्षात येताच आई-वडिलांनी तातडीने त्याला खाली उतरवले. यानंतर चार रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणत्याही रुग्णालयाने त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर अथर्व रुग्णालयात मुलावर उपचार करण्यात आला. त्यामुळे मुलाचे प्राण वाचले.
मात्र त्याच्या मानेला फॅक्चर झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा इयत्ता सातवीला असून वारंवार फोनवर गेम खेळायचा. आई-वडिलही त्याच्या या सवयीमुळे निराश होते, अखेर शुक्रवारी रात्री त्याचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला.
[read_also content=”IGCAR च्या शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा! चीन, अमेरिका सगळे पाया पडतील; भारताला हवं तसं जग चाले https://www.navarashtra.com/india/india-will-be-a-superpower-shocking-revelation-of-igcar-scientists-nrvk-276095.html”]
[read_also content=”OK म्हंटल्या शिवाय वाक्याचा शेवटचं होत नाही; OK शब्दामागची मनोरंजक हिस्ट्री आणि त्याचा फुल फॉर्म https://www.navarashtra.com/viral/interesting-history-behind-the-word-ok-and-that-full-form-276239.html”]
[read_also content=”कोणी गिफ्ट म्हणून किंवा फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका या वस्तू; नाहीतर तुमच्या मागे अशी ईडा-पिडा लागेल की… https://www.navarashtra.com/lifestyle/jyotish-tips-for-good-life-nrvk-276206.html”]
[read_also content=”मुंबईत रेल्वे पुलाखाली अडकला कंटेनर; ड्राहव्हरने असं डोक लावलं की पोलिसही शॉक झाले https://www.navarashtra.com/latest-news/container-stuck-under-railway-bridge-in-mumbai-nrvk-276226.html”]