Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बसवर दगडफेक, समर्थकांचा राडा; वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच परळीत वातावरण तापलं

बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असतानाही आंदोलने सुरू असल्याचे दिसत आहे. परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 14, 2025 | 04:40 PM
बसवर दगडफेक, समर्थकांचा राडा; वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच परळीत वातावरण तापलं
Follow Us
Close
Follow Us:

बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात केज कोर्टाने  आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यासोबतच त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.  कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर  परळीतील वातावरण तापलं आहे.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडला केज कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याधी केज कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती. आज वाल्मीक कराडची सीआयडी कोठडी संपली होती. त्यामुळे आज वाल्मीक कराडला पुन्हा केज कोर्टात हजर करण्यात आले होते. याशिवाय कराडवर मकोका (MCOCA) लावण्यात आला आहे.

Delhi Bomb Blast Call: दिल्लीतील 400 शाळांमध्ये बॉम्बस्फोटाचे खोटे कॉल; अल्पवयीन मुलाला अटक

बीड जिल्ह्यात संतोष देशमुख प्रकरणाने मोठे वळण घेतले असून, वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई म्हणून मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यात आला आहे. या निर्णयानंतर परळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाल्मिक कराड समर्थकांनी सकाळपासून आक्रमक भूमिका घेतली असून, परळी शहरात अचानक बंदची हाक देण्यात आली आहे. काही भागांमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली असून, यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असून, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निदर्शने आणि आंदोलने सुरू

परळीत कराड समर्थकांनी सकाळपासून निदर्शने सुरू केली आहेत. संतापलेल्या समर्थकांनी टायर पेटवून आपला रोष व्यक्त केला आहे. याचदरम्यान, एका महिलेने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण अधिकच तापले. कराडच्या ७५ वर्षीय आई आणि पत्नीनेही या निदर्शनांमध्ये भाग घेतला आहे.

यंदा हज यात्रेला किती भारतीय भाविकांना मिळणार लाभ? सौदीसोबतच्या करारत ठरला

आमदारांच्या पोस्टरवर चप्पल मारत रोष

कराड समर्थकांनी परळीत आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. त्यांच्या पोस्टरवर चप्पल मारत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच काही ठिकाणी टायर पेटवण्याचे प्रकार घडले असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने टायर विझवले.

जमावबंदीचे आदेश धाब्यावर

बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असतानाही आंदोलने सुरू असल्याचे दिसत आहे. परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.संतोष देशमुख प्रकरणाचा वाद चिघळत चालल्यामुळे प्रशासन सतर्क आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी व्यापक बंदोबस्त ठेवला आहे. परळीत वातावरण शांत ठेवण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

Web Title: The atmosphere in parli heated up as soon as mcoca entered valmik karad nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • Santosh Deshmukh Case

संबंधित बातम्या

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी
1

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार? 30 ऑगस्टला पुढील सुनावणी

वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार: न्यायालयाचं निरीक्षण
2

वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार: न्यायालयाचं निरीक्षण

वाल्मिक कराडला कोर्टाचा दणका, कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3

वाल्मिक कराडला कोर्टाचा दणका, कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

Walmik Karad : वाल्मिक कराडची अचानक प्रकृती बिघडली; रक्तदाबाचा त्रास होऊनही ॲडमिट का केलं नाही?
4

Walmik Karad : वाल्मिक कराडची अचानक प्रकृती बिघडली; रक्तदाबाचा त्रास होऊनही ॲडमिट का केलं नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.