Photo Credit- Social Media दिल्लीतील 400 शाळांमध्ये बॉम्बस्फोटाचे खोटे कॉल
नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी 400 शाळांमध्ये बॉम्बस्फोटाच्या खोट्या ईमेल आणि कॉल पाठवल्याच्या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. मुलाने एका वेळी 250 शाळांना ईमेल केले होते. या मुलाच्या या हालचालींमागे कोणाचा हात आहे. त्याच्याकडून हे कोण करून घेत आहे. याचा आता पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाचे कुटुंब एका एनजीओच्या संपर्कात होते. ही एनजीओ पूर्वी अफजल गुरुच्या फाशीला विरोध करणाऱ्या मोहिमेत सहभागी झाली होती. त्यामुळे पोलिस एनजीओच्या भूमिकेचा देखील बारकाईने तपास करत आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलाने ईमेलमध्ये ज्या प्रकारचे तांत्रिक शब्द वापरले, ते एका व्यावसायिक व्यक्तीकडून शिकवले गेले असावेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणी व्यक्ती सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने कोणीतरी जाणूनबुजून या अल्पवयीन मुलाचा वापर करत होते का. या घटनेमुळे अनेक शाळांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
ONGC मध्ये भरतीला सुरुवात; १०८ रिक्त पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती
पोलिसांनी या प्रकरणाचा विविध दृष्टिकोनांतून तपास सुरू ठेवला असून, एनजीओच्या भूमिकेसह ईमेलचा मागोवा घेण्यावर भर दिला आहे. मुलाला तांत्रिक मदत करणारा कोणी आहे का, 12.00 वाजता दिल्ली पोलिस मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार होते. परंतु, काही कारणांमुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.
दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब धोक्याची तक्रार नोंदवलेल्या शाळांमध्ये टागोर इंटरनॅशनल स्कूल, ब्लूबेल्स स्कूल इंटरनॅशनल, मदर्स इंटरनॅशनल स्कूल, मॉडर्न स्कूल, स्प्रिंगडेल्स स्कूल, जीडी गोएंका पब्लिक स्कूल, सेंट कोलंबा स्कूल आणि दिल्ली पब्लिक स्कूल यांचा समावेश आहे.
तब्बल १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकांनी केली घोषणा
दरम्यान, चार दिवसांपूर्वीेदेखील अशाच पद्धतीने शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा खोटा कॉल करण्यात आला होता. या धमकीमुळे दिल्ली पोलिसांची झोप उडाली होती. पूर्वी धमकीचे फोन येत असत आणि पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हे धमकीचे फोन बनावट असल्याचे आढळून आले. आता या प्रकरणात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बच्या धमकीचे बनावट ईमेल पाठवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका मुलाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अनेक शाळांना बनावट बॉम्ब धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका मुलाला अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिस आज पत्रकार परिषद घेणार आहेत. दिल्लीतील विविध शाळांना बॉम्ब धमकीचे ईमेल पाठवल्याचे प्रकरण सोडवले गेल्याचे मानले जात आहे.
Jammu Kashmir Blast : जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये भीषण स्फोट; ६ जवान जखमी