Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Politics: कल्याणमध्ये  ‘गायकवाड विरुद्ध गायकवाड’ वाद पुन्हा उफाळणार

सप्तशृंगी इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाइकांना वाटप करण्यात आलेल्या सरकारी मदतीवरून शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांनी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 18, 2025 | 09:05 AM
Kalyan Politics: कल्याणमध्ये  ‘गायकवाड विरुद्ध गायकवाड’ वाद पुन्हा उफाळणार
Follow Us
Close
Follow Us:

Kalyan Politics:  कल्याणमधील राजकारण पुन्हा एकदा ‘गायकवाड  विरूद्ध गायकवाड’ असा वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात, भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणामुळे कल्याणचे राजकारणही चांगलेच तापले होते.

या प्रकरणापासून गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. पण आता पुन्हा या दोघांमधील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचा गणपत गायकवाड गट आणि शिवसेनेच महेश गायकवाड या दोन गटात पुन्हा एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची चिन्हं दिसत आहेत.

Stock Market Today: सपाट पातळवीर होणार शेअर बाजाराची सुरुवात? ‘हे’ शेअर्स पालटणार गुंतवणूकदारांचं नशिब

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना जाहीर झालेल्या ५ लाख रुपयांच्या शासकीय मदतीच्या वाटपावरून हा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.  माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पिडीतांना ही मदत वाटण्यात आली होती.पण यावरून आता नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण (पूर्व) मतदारसंघातील मतदारांनी गायकवाड कुटुंबावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. तुरुंगात असलेले भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांनी त्यांच्या पतीचे दीर्घकालीन राजकीय प्रतिस्पर्धी महेश गायकवाड यांचा 26,408 मतांनी पराभव करत निर्णायक विजय मिळवला होता.

सुलभा गायकवाडांच्या या विजयामुळे गायकवाड कुटुंबाचा कल्याणच्या राजकारणातील प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला आहे. त्यामुळे भाजपसाठीही  सुलभा गायकवाड यांचा हा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कल्याण पूर्वमधील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना देण्यात आलेल्या पाच लाख रुपयांच्या सरकारी मदतीचे धनादेश भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयातून वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महसूल विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण

ही मदत वाटप सोहळा सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयातच आयोजित केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणि टीकेला उधाण आले आहे. विरोधकांनी यावर आक्षेप घेत, सरकारी मदत खासगी राजकीय कार्यक्रमातून वाटली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे कल्याण पूर्वमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. सप्तशृंगी इमारत दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाइकांना वाटप करण्यात आलेल्या सरकारी मदतीवरून शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांनी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“सरकारी निधी देऊन स्वतःच्या झोळीत पुण्य मिळवण्याचा प्रयत्न सुलभा गायकवाड करत आहेत,” असा आरोप महेश गायकवाड यांनी केला. “कल्याण पूर्वमध्ये यापूर्वीही अनेक दुर्घटना घडल्या. त्यावेळी बाधित नागरिकांना एक रुपयाचाही निधी देण्यात आलेला नाही. मात्र, आता सरकारचा निधी माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवशी वितरित केला जातो, हे दुर्दैवी आहे,” असे गायकवाड म्हणाले. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

 

Web Title: The gaikwad vs gaikwad controversy will flare up again in kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • mahesh gaikwad

संबंधित बातम्या

Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक
1

Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.