Stock Market Today: सपाट पातळवीर होणार शेअर बाजाराची सुरुवात? 'हे' शेअर्स पालटणार गुंतवणूकदारांचं नशिब
जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज १८ जून रोजी बुधवारी सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. मंगळवारी, देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. मंगळवारी, बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स २१२ अंकांनी घसरून ८१,५८३ वर बंद झाला, तर निफ्टी ९३ अंकांनी घसरून २४,८५३ वर बंद झाला.
बेंचमार्क निफ्टी ५० २४,९०० च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स २१२.८५ अंकांनी म्हणजेच ०.२६% ने घसरून ८१,५८३.३० वर बंद झाला, तर निफ्टी ५० ९३.१० अंकांनी म्हणजेच ०.३७% ने घसरून २४,८५३.४० वर बंद झाला. शेअर बाजारात काल झालेल्या घसरणीनंतर आजची सुरुवात कशी होणार, याबाबत गुंतवणूकदार चिंतेत आहेत. पश्चिम आशियातील वाढत्या घसरणीमुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांक नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
१८ जून रोजी आज भारतीय शेअर बाजार सपाट पातळीवर उघडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बुधवारी एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ डेरिव्हेटिव्ह आणि टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट नंदीश शाह यांनी नोंदवले की, निफ्टी ५० २५,००० चा टप्पा ओलांडण्यात अयशस्वी ठरला. हिंदुस्तान झिंक, पॉलीकॅब इंडिया, युग्रो कॅपिटल, दिल्लीवरी, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, विशाल मेगा मार्ट, जीएमआर विमानतळ, टाटा पॉवर, महिंद्रा अँड महिंद्रा, रेलटेल हे शेअर्स आज गुंतणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
सकाळी उठताच फोन चालवताय? मग वेळीच व्हा सावध, तुम्हीही करत आहात ही घोडचूक
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूरदारांना सायंट, सन फार्मा आणि मेडिको रेमेडीज हे स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तर चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूरदारांना इंटेलेक्ट डिझाइन अरेना, नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड, मान अॅल्युमिनियम, नेलकास्ट आणि स्टील स्ट्रिप्स व्हील्स हे स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
तज्ज्ञांनी आज गुंतवणूरदारांसाठी टीडी पॉवर सिस्टम्स लिमिटेड, सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, फेडरल बँक लिमिटेड, टाटा केमिकल्स लिमिटेड, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई), अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड आणि युनिव्हर्सल केबल्स लिमिटेड हे स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.