संग्रहित फोटो
आंबेडकरनगर येथील परमेश्वर श्रीराम रोठे (वय ४१) यांची दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी ५ जुलै रोजी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील ५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपींची ओळख पटली. जुनेद आणि परवेज हे बांधकामावर स्लॅब टाकण्याचे काम करतात. गर्दीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या जुन्या दुचाकींवर पाळत ठेवून ते बनावट चावीने गाड्या चोरत आणि विक्रीसाठी नारेगावातील जमीरच्या गॅरेजमध्ये देत होते. एमजीएम परिसरातून दुचाकी चोरलेला आरोपी जुनेद सेंटरच्या मोकळ्या मैदानाकडे येणार असल्याची माहिती १७ ऑक्टोबर रोजी उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांच्या पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून जुनेदला चोरीच्या दुचाकीसह पकडले.
चौकशीत त्याने परवेज आणि जमीरची नावे सांगितली. पोलिसांनी परवेजकडून एक, जमीरच्या गॅरेजमधून दोन, भोकरदनजवळ चार ते पाच हजारांना विक्री केलेल्या दोन आणि सावंगी बायपास रोडवरील झाडाझुडपांत लपवलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या. जुनेदकडील दुचाकीसह एकूण आठ गाड्या हस्तगत करण्यात आल्या. कारवाईत हवालदार मंगेश पवार, सहदेव साबळे, अमोल अंभोरे, नरेश भोंडे आणि अतुल सोळंके सहभागी होते.
गॅरेजमध्ये गाड्यांची विक्री
जुनेद व परवेज गर्दीच्या ठिकाणी दुचाकींची रेकी करून बनावट चावीच्या मदतीने काही सेकंदांत गाड्या पळवत होते. चोरीच्या दुचाकी नारेगावातील गॅरेजचालक जमीरकडे विक्रीसाठी दिल्या जात होत्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक करून आठ दुचाकी हस्तगत केल्या.
दोघेही निघाले भुरटे चोर
जुनेद, परवेज हे मित्र आहेत. दोघे नशेसाठी बॅटऱ्या चोरी करुन ते पैशांतून व्यसनाची भूक भागवत होते. काही दिवसांपूर्वी चिकलठाणा परिसरात त्यांना बॅटरी चोरतांना नागरिकांनी पकडले होते. नागरिकांनी त्यांना चांगला चोप दिल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती.
Ans: सिडको पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
Ans: आरोपींकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
Ans: परिसरातील सुमारे ५० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.






