पुणे-नाशिक महामार्गावरील तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे ऋषी पेट्रोल पंपावर शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दरोड्याची घटना घडली आहे.
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एलसीबी पथकाने केलेल्या कारवाईत उमळवाड फाटा, जयसिंगपूर येथे चरस विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक केली आहे.
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना शुक्रवारी कोलंबो येथे अटक केली, जेव्हा ते त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात वैयक्तिक प्रवासासाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याच्या आरोप आहे.
पुणे- सोलापूर महामार्गालगत कदमवाकवस्ती (कवडीपाठ) येथील राजधानी बेकरीमध्ये विक्रीस असलेल्या केकमध्ये आळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पुणे शहरात दोन दिवसात चोरट्यांनी वेगवेगळ्या भागातील चार बंद फ्लॅट फोडत लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. चारही फ्लॅटमधून साडे तीन लाखांचा ऐवज लांबविला आहे.
चोरीचा मोबाईल आणि सिमकार्ड वापरून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने, इचलकरंजी, कोल्हापूर येथून अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल आणि तीन सिमकार्ड जप्त करण्यात…
कराड शहरातील कोल्हापूर नाक्यावर असलेल्या महात्मा गांधी रिक्षा गेटजवळ खंडणीसाठी गुंडाने रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी रात्री साडेआठाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
वडगाव (तालुका हातकणंगले) येथील दीपक सर्जेराव थोरवत यांच्या कुटुंबीयांना स्प्रे मारून बेशुद्ध करुन घरामधील काही रोख रक्कम व दागिने अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गाडी उभी करण्याच्या वादातून संतप्त झालेल्या व्यक्तीने लोखंडी रॉडने पाच जणांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना ब्राह्मणवाडी साते (ता. मावळ) येथे घडली आहे.
पुण्यातील धायरी परिसरातील रायकर मळा येथील श्री ज्वेलर्स या सराफी पेढीत भरदिवसा घुसून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या तीनपैकी दोन आरोपींना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
'तू माझ्याशी लग्न केले नाहीस, तर तुझे लग्न होऊ देणार नाही. फोटो व्हायरल करेन, करंट लावून जीव देईन’ अशा धमक्या देत तरुणाने १९ वर्षीय तरुणीचा मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस…
मलकापूर (ता. कराड) येथील औदुंबर कॉलनीत दरवाजा उघडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी सुमारे साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. मलकापूरमधील आगाभाई चाळ येथे ही चोरीची घटना घडली आहे.
फलटणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. साखरवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत गांजाची वाहतूक करणाऱ्या संशयितांनी पोलिसाला फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.