Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शैक्षणिक पंढरीत गुन्हेगारी बोकाळली; वर्दळीच्या FC रस्त्यावर चोरट्यांनी फोडली ५ दुकाने, किती रक्कम लुटली?

महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी चांगलीच वाढलीये. नशाखोरी, बड्या बेट्यांचे कारनामे, महिलांवरील अत्याचार आणि गुंडगिरीने कायद्याचं शासन आहे, की नाही, हा प्रश्न उद्धभला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2024 | 05:07 PM
शैक्षणिक पंढरीत गुन्हेगारी बोकाळली; वर्दळ असणाऱ्या FC रस्त्यावर चोरट्यांचा धुमाकूळ, किती रक्कम लुटली?

शैक्षणिक पंढरीत गुन्हेगारी बोकाळली; वर्दळ असणाऱ्या FC रस्त्यावर चोरट्यांचा धुमाकूळ, किती रक्कम लुटली?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात गुन्हेगरीचे प्रमाण वाढले आहे. कोयता गॅंग, हीट अँड रन, महिलांवरील अत्याचारांचे प्रकार, अपघाताची सत्र सुरूच आहेत. तर पुण्यात सायबर क्राईमच्या  घटना देखील वाढलेल्या दिसत आहेत. चोरीच्या घटना अशा सर्वच प्रकारचे गुन्हे वाढताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुणे पोलीस कसोशीने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहेत. दरम्यान आता पुण्यातील वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर एका रात्रीत पाच दुकाने फोडल्याची घटना घडली आहे.

सध्या दिवाळीमुळे पुणे शहरात गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत , प्रमुख मार्गांवर वर्दळ वाढली आहे. मात्र याचाच फायदा घेत चोरट्यांनी फर्ग्युसन रस्त्यावर दुकाने फोडली आहेत. चोरट्यांनी पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील दुकाने फोडली आहेत. एका रात्रीत एकूण ५ दुकाने चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे.  उपलब्ध माहितीनुसार, चोरट्यांनी लाखोंचा माल लुटला आहे. जवळपास १.२५ लाख रुपये लुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डेक्कन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अट्टल चोरट्यांनी दुकाने फोडली असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पुण्यात दोन गटांत हाणामारी

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच आता आळंदी रस्त्यावर असलेल्या कळस गावात पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हाणामारीत चौघे जखमी झाले असून, याप्रकरणी परस्परविराेधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल भीष्मा चव्हाण (वय २४, रा. कळस ) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चव्हाणच्या तक्रारीनुसार रोहित लोखंडे (रा. दिघी), गगन लाड (रा. टिंगरेनगर) आणि स्वप्नील महाजन (रा. कळस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात गुन्हेगारी वाढली

महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी चांगलीच बोकाळलीय. नशाखोरी, बड्या बेट्यांचे कारनामे, महिलांवरील अत्याचार आणि गुंडगिरीने पुणे शहरात कायद्याचं शासना राहिलंय की नाही, असा प्रश्न उद्धभला आहे. गेल्या काही महिन्याखाली पुणे शहरातील सुस येथे बिल्डरने तुफान राडा घातल्याचा प्रकार समोर आला होता. एका बिल्डरने रहिवाशांना चक्क दंडुक्याने मारहाण केली होती. महिलांनादेखतच अश्लील शिवीगाळ केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सुस येथील लगतच्या सोसायटी धारकांसोबत सुरु असलेल्या जमिनीच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली.  पोलीस घटनास्थळी येताच प्रकरण थंडावले. नंतर बिल्डरला घेऊन पोलीस येत असताना रहिवाशांनी गाडीची डिकी तपासण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी डिकी तपासली असता लाकडी दांडके आणि बॅट्स आढळल्या. त्यावरून बिल्डर कट रचून आल्याचा आरोप तीर्थ टॉवर्सच्या रहिवाशांनानी केला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.

 

Web Title: Thefts looted 5 shops at fc and jm road pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 05:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.