Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime: कराडमध्ये चोरट्यांचा हैदोस; तीन बंगले एकाच वेळी फोडले अन्…; एकदा वाचाच

लिला जाधव या दोनच दिवसांपुर्वी आजारी असल्याने गोवा या ठिकाणी गेल्या आहेत. चोरट्यांनी विजयकुमार बाबुराव देसाई हे आपल्या लक्ष्मी निवास या बंगल्याला कुलूप लावून काही दिवसांसाठी मुंबईला मुलाकडे गेले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 20, 2025 | 04:15 PM
Crime: कराडमध्ये चोरट्यांचा हैदोस; तीन बंगले एकाच वेळी फोडले अन्…; एकदा वाचाच
Follow Us
Close
Follow Us:
मसूर: माळवाडी ता. कराड येथे चोरट्यांनी बंद घरांना लक्ष करीत एका रात्रीत कडीकोयंडे व कुलूपे तोडून सलग तीन बंगले फोडले. एका घरातील १तोळे वजनाची सुमारे ७० हजार रुपये किमतीच्या सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. उर्वरित दोन्ही बंगल्यात चोरांच्या हाती काही लागले नाही. हा चोरीचा प्रकार शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

 याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मसूर ते शामगाव रस्त्याजवळ माळवाडी ता. कराड गावातील रस्त्यावरील बंद असणारे सलग तीन बंगले चोरट्यांनी लक्ष केले. कडीकोयंडे व कुलपे तोडून घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. तीन बंगल्याच्या मध्यवर्ती लीला संपत जाधव यांचा बंगला आहे. यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाट उचकटून १ तोळे २ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लंपास केली.

लिला जाधव या दोनच दिवसांपुर्वी आजारी असल्याने गोवा या ठिकाणी गेल्या आहेत. चोरट्यांनी विजयकुमार बाबुराव देसाई हे आपल्या लक्ष्मी निवास या बंगल्याला कुलूप लावून काही दिवसांसाठी मुंबईला मुलाकडे गेले आहेत. चोरट्यांनी यांच्या घराला लक्ष करत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडले व कपडे उचकटले व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकले. परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

हेही वाचा: Crime: चालकाने चोरले मालकाच्या पत्नीचे 10 तोळ्यांचे दागिने; शिरूरमधील घटना, गुन्हा दाखल

त्यानंतर माजी उपसरपंच प्रमिला मधुकर घाडगे यांच्या मधुप्रेम या बंगल्याकडे आपला मोर्चा वळवला. दाराला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाट उचकटले. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. सदर चोरीच्या प्रकाराची फिर्याद लीला जाधव यांची मुलगी सौ सुजाता विक्रमसिंह पोळ रा. यशवंतनगर – उत्तर कोपर्डे यांनी मसूर पोलिसात दिली. पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मसूर पोलीस ठाण्याचे सपोनि आदिनाथ खरात करीत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने भेट देऊन चोरीच्या प्रकाराची पाहणी केली. पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले होते.

चालकाने चोरले मालकाच्या पत्नीचे 10 तोळ्यांचे दागिने
शिरुर बाजार समितीचे माजी उपसभापती तसेच राष्ट्रवादीचे नेते मानसिंग पाचुंदकर यांच्या एका वाहनावर नितीन मिटकरी चालक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान पाचुंदकर यांच्या पत्नी ज्योती या काही कामाच्या निमित्ताने त्यांच्या कारमधून गेलेल्या असताना त्यांनी त्याचे दहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण पर्समध्ये ठेवून पर्स कार मध्ये ठेवली. त्यावेळी चालक कारमध्येच होता. काम आटोपून ज्योती पाचुंदकर पुन्हा कारमध्ये बसून घरी आल्यानंतर त्यांनी पर्सची पाहणी केली असता पर्समध्ये दागिने नसल्याचे निदर्शनास आले. नसल्याने चालकाने दागिने चोरी केल्याबाबतचा अंदाज पाचुंदकर यांनी वर्तविला.

 

Web Title: Thieves burglary at three bunglows and stolen jwellery karad malwadi crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 04:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.