फोटो- istockphoto
शिक्रापूर: शिरुर बाजार समितीचे माजी उपसभापती तसेच राष्ट्रवादीचे नेते मानसिंग पाचुंदकर यांच्या एका वाहनावर नितीन मिटकरी चालक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान पाचुंदकर यांच्या पत्नी ज्योती या काही कामाच्या निमित्ताने त्यांच्या कारमधून गेलेल्या असताना त्यांनी त्याचे दहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण पर्समध्ये ठेवून पर्स कार मध्ये ठेवली. त्यावेळी चालक कारमध्येच होता. काम आटोपून ज्योती पाचुंदकर पुन्हा कारमध्ये बसून घरी आल्यानंतर त्यांनी पर्सची पाहणी केली असता पर्समध्ये दागिने नसल्याचे निदर्शनास आले. नसल्याने चालकाने दागिने चोरी केल्याबाबतचा अंदाज पाचुंदकर यांनी वर्तविला.
याबाबत मानसिंग नानाभाऊ पाचुंदकर वय ४२ वर्षे रा. रांजणगाव गणपती भांबर्डे रोड ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी नितीन मुरलीधर मिटकरी सध्या रा. चंदननगर पुणे मूळ रा. जुना कराडनाका पंढरपूर जि. सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असल्याचे सांगत लवकरच आरोपीला अटक करुन मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा: पुण्यात घरफोडी करणारा अल्पवयीन ताब्यात; तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त
भारती विद्यापीठ परिसरात पादचारी महिलेकडील दागिने चोरून नेण्यात आले होते. पसार झालेल्या दुचाकीस्वार चोरट्याचा माग काढण्यात येत होता. गस्त घालणारे पाेलीस शिपाई मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना अल्पवयीनाने महिलेचे दागिने चोरुन नेल्याची मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पेरुची बाग परिसरातून ताब्यात घेतले. तपासात त्याने भारती विद्यापीठ परिसरात घरफोडीचे दोन गुन्हे, तसेच दागिने चोरीचा एक गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून १३ ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.