मुंबई: राज्याच्या राजकारणात पडद्यामागे अनेक हालचाली घडत असल्याची चर्चा आहे. येत्या दिड-दोन महिन्यात राज्यात खूप मोठ्या घडामोडी घडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी कायम असून त्यांना दूर केले जात आहे, तर दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील जवळीकता वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी घेतलेले अनेक योजना आणि निर्णय रद्द केले जात आहे. तर मुख्यमं देवेंद्र फडणवीस अजित पवारांना जवळ करून एकनाथ शिंदेंना दूर करण्याची रणनीती आखत असल्याचे दिसत आहे. असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
मयत संतोष देशमुख यांचे देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा उल्लेख करत दमानिया म्हणाल्या,” मी तीन महिन्यांपूर्वीचे सीसीटिव्ही फुटेज पाहिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या सीसीटिव्ही फुटेजमध्ये आरोपी गाडीतून उतरून पळून जाताना दिसत आहेत. पुढे पोलिसांचा फौजफाटा आणि नाकाबंदी दिसत आहे. ते पाहून आरोपी पळून जाताना दिसत आहेत. पण आरोपींना पळून जाण्यासाठी पोलिसांनीच तर मदत केली नाही ना, असाही संशय निर्माण होत आहे.
संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना
पुरावेही दिले आहेत. मग त्यांच्यावर योग्य ती कारवाई कधी होणार, असा सवालही अंजली दमानिया यांनी व्यक्त केला. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या चौकशीची आणि राजीनाम्याची घोषमा होईल, अशी मला अपेक्षा आहे. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, सीसीटीव्ही फुटेज आणि आतापर्यंतच्या घटनाक्रमावरून आरोपी वाशी परिसरात वाहन सोडून फरार झाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असला, तरी ते कोणत्या जंगलातून पसार झाले, याचा ठोस मागोवा घेतला गेला नाही.
महिलांसाठी नवा सुरक्षा फॉर्म्युला; पुणे पोलिसांचे ‘महिला बीट मार्शल’ देणार मदतीचा हात
धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत म्हटले की, आरोपी पळून जाण्यासाठी जंगलातून वेगवेगळे मार्ग उपलब्ध होते. पोलिसांनी त्या मार्गांवर रेकी ठेवली असती, तर आरोपींना अटक करणे सोपे झाले असते. भावाचा खून झाला असतानाही पोलिसांनी सुरुवातीला हा तपास गांभीर्याने घेतला नाही. सीआयडीकडे तपास गेल्यानंतरच प्रकरणाची योग्य दखल घेतली जाऊ लागली. आम्ही वारंवार पोलिसांना ऍक्शन घेण्याची विनंती करत होतो.
कॉल रेकॉर्डिंग आणि सीडीआर (Call Detail Record) तपासण्याची मागणी केली होती, पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आरोपींना पोलिसांचे कॉल येत होते का? याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. धनंजय देशमुख यांच्या या आरोपांमुळे प्रकरण आणखी गडद झाले असून, पोलिस तपासाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.