जोगेश्वरी भीषण आग ओशिवरा फर्निचर मार्केट मध्ये गॅस सिलेंडर स्फोट झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई – मुंबईमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात ही आगीची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. 8 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 8 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरीमधील फर्निचर मार्केटमध्ये ही आग लागली. ओशिवरा मार्केटमधील एका फर्निचरच्या गोदामात लागली. मुंबईतील ओशिवरा फर्निचरच्या गोदामात ही आग लागली. आग लागण्याचे कारण हे सिलिंडर स्फोट होते. सकाळी 11.30 च्या सुमारास ही आग लागली. वृत्तसंस्था आयएएनएसने मुंबई अग्निशमन दलाच्या हवाल्याने सांगितले की, मुंबईतील अंधेरी येथील ओशिवरा परिसरातील फर्निचरच्या गोदामात आग लागली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या आगीमुळे जोगेश्वरी परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहे. ही आग फर्निचरच्या मार्केटमध्ये लागली असून आजूबाजूला देखील फर्निचरची दुकानं आहेत. त्यामुळे आग पसरण्याची शक्यता आहे. आगीच्या ज्वाला या मोठ्या असून बघ्यांची देखील घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली आहे. यामध्ये 20 ते 25 दुकानांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. ओशिवरा मार्केटमध्ये मागील दीड तासापासून अग्नितांडव सुरु आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
Mumbai, Maharashtra: A Level-II fire erupted at a furniture godown in Oshiwara Furniture Market, Jogeshwari West. MFB, police, Adani, ward staff, and 108 ambulance responded. The fire was confined to the ground floor, with no injuries reported pic.twitter.com/QKe6YnkVqE
— IANS (@ians_india) February 11, 2025