Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: गणेशोत्सवाच्या प्रवासाला वरंधा घाटात अपघाताचे गालबोट; दोन कारचा चक्काचूर,तिघे गंभीर

गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या प्रवाशांच्या प्रवासाला वरंधा घाटातील भीषण अपघाताने गालबोट लागले. मध्यरात्री दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली; तिघे गंभीर जखमी झाले, तर दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 13, 2026 | 12:59 PM
Accident News: गणेशोत्सवाच्या प्रवासाला वरंधा घाटात अपघाताचे गालबोट; दोन कारचा चक्काचूर,तिघे गंभीर

Accident News: गणेशोत्सवाच्या प्रवासाला वरंधा घाटात अपघाताचे गालबोट; दोन कारचा चक्काचूर,तिघे गंभीर

Follow Us
Follow Us:
  • कोंढरी गावाजवळ दोन कारची समोरासमोर जोरदार धडक
  • अपघातात तिघे गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरू
  • तीव्र वळणावर वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात
पुणे: गणेशोत्सवाच्या उत्साहात कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाला वरंधा घाटातील भीषण अपघाताने गालबोट लागले.  पुणे जिल्ह्यामधील भोर-महाड मार्गावरील निसर्गरम्य; मात्र धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरंधा घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. कोंढरी गावाच्या हद्दीत झालेल्या या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, धडक इतकी भीषण होती की दोन्ही कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

तीव्र वळणावर भीषण धडक

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील एका कारमधून गणेशोत्सवासाठी प्रवासी कोकणाच्या दिशेने जात होते. मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही वाहने वरंधा घाटातील कोंढरी गावाच्या हद्दीत एका तीव्र वळणावर आली. घाटातील वळण, अंधार आणि समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने दोन्ही कार एकमेकांसमोर आल्या आणि त्यांची जोरदार धडक झाली. धडक एवढी तीव्र होती की त्याचा मोठा आवाज परिसरात घुमला. अपघातानंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे घटनास्थळावरील चित्र होते. अपघातामुळे काही काळ मार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा:गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना काळाचा घाला; मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, २५ फूट खोल दरीत दुचाकी कोसळली अन्…

ग्रामस्थांनी केले मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच कोंढरी गावातील स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना वाहनांमधून बाहेर काढण्यासाठी मदतकार्य करण्यात आले. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी प्रथमदर्शनी घाटातील तीव्र वळणावर वाहनांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

गणेशोत्सवामुळे घाटात वाहनांची गर्दी

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक कोकणाकडे रवाना होत असल्याने भोर-महाड मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. वरंधा घाटात अनेक ठिकाणी तीव्र वळणे असून रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी होते. त्यामुळे वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने पोलिसांनी वाहनचालकांना घाटातील वळणांवर वेग कमी ठेवण्याचे आवाहन केले आहे. समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेत सावधपणे वाहन चालवावे, ओव्हरटेक करणे टाळावे आणि रात्रीच्या प्रवासात विशेष काळजी घ्यावी, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली, तरी तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घाटमार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Two cars collide head on at midnight in punes varandha ghat three critically injured vehicles mangled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 12:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.