Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर दोघांकडून गोळीबार; पहाटेच्या सुमारास हल्लेखोर आले अन्…

साई उमरवाल यांचा मुलगा मनीष उर्फ मोतीलाल साई उमरवाल हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे एखाद्या व्यवहारातून त्यांचे कोणाशी काही बिनसले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2026 | 01:53 PM
खळबळजनक ! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर दोघांकडून गोळीबार; पहाटेच्या सुमारास हल्लेखोर आले अन्...

खळबळजनक ! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर दोघांकडून गोळीबार; पहाटेच्या सुमारास हल्लेखोर आले अन्...

Follow Us
Follow Us:

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच पंचवटी परिसरात टोळीयुद्धातून नागचौक आणि हिरावाडी परिसरात गोळीबार झाल्याच्या घटनेने नागरिक दहशतीखाली आहेत. असे असतानाच म्हसरूळ परिसरात एका व्यावसायिकाच्या घरावर पहाटे दोघा संशियतांकडून गोळीबार करण्यात आला.

पंचवटी परिसरात प्राणघातक हल्ले, खून, जबरी लूट, भाविकांची दिवसाढवळ्या लुटीचे प्रकार सुरू असताना टोळीयुद्धानेही डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच म्हसरूळ परिसरात कलानगर लेन नंबर पाचमध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक साई अंगद उमरवाल (वय ६९) हे आपली मुले संतोष, मनीष उर्फ मोतीलाल साई उमरवाल, सुना व नातवंडे यांच्यासोबत एकत्र राहतात. रविवारी (दि. ५) पहाटे अज्ञात दोघा संशयितांनी उमरवाल यांच्या घरासमोर उभी असलेल्या (एमएच १५ जीआर २९००) कारच्या काचा फोडून नुकसान केले होते.

दरम्यान, या तोडफोडीबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत आहेत. त्यातच पहाटे ४.३७ वाजता अज्ञात दोघांनी येत साई उमरवाल यांच्या घराच्या दिशेने गोळीबार करत ते दुचाकीवरून फरार झाले. गोळीबार करत असल्याची घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

उमरवाल यांचा मुलगाही जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात

साई उमरवाल यांचा मुलगा मनीष उर्फ मोतीलाल साई उमरवाल हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे एखाद्या व्यवहारातून त्यांचे कोणाशी काही बिनसले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच, मनीष याला सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यातून त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला का, या दिशेने देखील पोलीस शोध घेत आहेत.

तुळजापुरातही गोळीबाराची घटना

दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी तुळजापूर येथे अज्ञातांकडून बारसमोर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गटात हाणामारी झाली. त्यांनतर या हाणामारीत गोळीबाराची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना शनिवारी (दि. 07) सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ पथकही पोहोचले होते. पंचनामा करून परिसराची पाहणी करण्यात आली आहे. पोलीस गोळीबार का करण्यात आला? याचा तपास सुरु आहे.

हेदेखील वाचा : मोठी बातमी! हॉस्टेलमध्ये मृतदेहांचा खच! अंदाधुंद गोळीबारात 11 ठार तर…; South Africa हादरली

Web Title: Two people opened fire on the builders house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Firing News
  • Nashik News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.