Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरण हत्याकांड प्रकरण: आरोपी दाऊद शेखला अटक; सीसीटीव्ही फुटेजही समोर

एकतर्फी प्रेमातून आरोपीने यशश्रीचे हालहाल करून तिची निर्घृणपणे हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तिच्या मृतदेहाची विटंबनाही केली. तिच्या गुप्तांगांवर आणि पोटावर वार करून तिचा मृतदेह छिन्नविछिन्न केला होता. 25 जुलैपासून यशश्री बेपत्ता होती. उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागे असलेल्या मैदानातील झुडुपांत तिचा मृतदेह आढळून आला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 30, 2024 | 08:44 AM
Photo Credit : Social Media

Photo Credit : Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  उरणमधील  यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या संशयित आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटक पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. हत्या झाल्यानंतर दाऊद शेख फरार झाला होता. दरम्यान,  यशश्रीच्या हत्येपूर्वीचे काही  सीसीटीव्ही फुटेजही  समोर आले आहेत. यात आरोपी दाऊद शेख हा तिचा पाठलाग करताना दिसत आहे.

एका व्हिडीओमध्ये, यशश्री  रस्त्याने जाताना दिसत आहे. तर दाऊद शेख तिचा पाठलाग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता उरणसह राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर  कठोर कारवाई करा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. दरम्यान गुरूवारी (25 जुलै) यशश्री नोकरीवर जाण्यासाठी घराबाहेर पडली. दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान, सायंकाळी साधारण साडेचार वाजण्याच्या सुमारास तिचा फोन बंद झाला. तेव्हापासून ती कोणालाच दिसली नाही. पण दाऊदने तिला गाठून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात  आहे.

दाऊदने यशश्रीची हत्या का केली असावी?

मिळालेल्या माहितीनुसार, 2018-19 च्या काळात यशश्रीशी ओळख वाढवून दाऊदने तिला जाळ्यात ओढले आणि 2019 साली तिच्यावर अत्याचारही केला होता. यशश्री आणि तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दाऊदवर पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. दाऊदच्या मनात याच गोष्टीचा राग होता. काही दिवसांपूर्वी दाऊद तुरूंगातून सुटून आला. तेव्हापासून त्याने पुन्हा तिचा पाठलाग सुरू केला होता.

तुरुंगातून सुटल्यापासून तो यशश्रीला त्रास देत होता. पण तिने याबाबत कुणालाही सांगितले नव्हते.  पण 25 जुलैलै यशश्री अचानक बेपत्ता झाली आणि दोन दिवसानंतर तिचा मृतदेह सापडला. तिच्या गुप्तांगांवर आणि पोटावर वार करून तिचा मृतदेह छिन्नविछिन्न केला होता.  यशश्रीचा 27 जुलैला मृतदेह सापडला तेव्हा त्याची अवस्था खूपच भयानक होती.  मृतदेहावर चाकूने वार केलेले होते. मृतदेहावर असंख्य जखमाही होत्या. कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत होते.  तिच्या हत्येनंतर तिच्या आई- वडिलांनी दाऊद शेखनेच तिची हत्या केल्याचा आरोप केला  आहे.

Web Title: Uran massacre case suspected accused dawood shaikh arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 08:33 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.