संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालणार 'या' कोर्टात, मोठं कारण आलं समोर
Santosh Deshmukh Case News in Marathi: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सरपंचाची हत्येतील सर्व आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून चार आरोपी फरार आहेत. सरपंचाची हत्या साधी नव्हती, लायटरने मृत सरपंच संतोष देशमुख यांचे डोळे उजळले, संपूर्ण पाठ काळीनिळी होईपर्यंत मारलं. शेवटला जीव जात नव्हता म्हणून त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकड़ून करण्यात आला. याचदरम्यान आता या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला पोलिसांनी पकडले आहे. या हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता चार वर गेली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी मधील मुख्य आरोपी आहे.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांची गाडी अडवली. सहा ते सात जणांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांना बेदम मारहाण करुन नंतर त्यांची हत्या करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, आता चौथ्या आरोपीला अरेस्ट केलं आहे. देशमुख हत्येप्रकरणात चाटे मास्टरमाईंट असल्याचा संशय आहे. तसेच पवनचक्की अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली देखील विष्णू चाटेवर गुन्हा दाखल आहे. बीड परिसरातून चाटेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी केली आहे. यानंतर हा मुद्दा राज्यासह संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गाजताना दिसत आहेत.
विष्णू चाटे हा केज हे कवडगाव तालुक्याचे पूर्व सरपंच होते. त्यानंतर विष्णू चाटे याला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सह आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्याला निलंबित करण्यात आले. विष्णू चाटे हा धनंजय मुंडे समर्थक असून तो वाल्मीक कराड यांचा निकटवर्तीय समजला जातो.विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.