बदलापूर अत्याचार प्रकरणातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांचं निलंबन (फोटो सौजन्य-X)
Badlapur Case News Marathi: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब आणि तपासातील विलंबाबद्दल ठपका ठेवत खातेनिहाय चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वकील हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयाला दिली. अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तब्बल 12 तास लावल्याचा आरोप पीडित चिमुकलीच्या आईने केला होता.
यासाह लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी आणि शाळेच्या विश्वास्तांविरूद्ध दोन आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. असे हायकोर्टाला सांगण्यात आलं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकातर्फे उपस्थित असलेले सरकारी वकिल हितेन वेणेगावकर यांनी सांगितले की, तपास पूर्ण झाला आहे आणि एसआयटी बरखास्त झाली आहे. असं त्यांनी सांगितलं.
ऑगस्ट महिन्यात बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडली होती. ज्या शाळेत हा किळसवाणा प्रकार घडला, त्या शाळेचे अध्यक्ष आणि विश्वस्तांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आज १ ऑक्टोबरला सुनावणी झाली बदलापूरच्या घटनेनंतर पोलिसांनी संस्थेच्या चालकांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. केवळ पोलिसांनी ट्रस्टीला अद्याप अटक केलेली नाही. ट्रस्टच्या बिनबोभाट जमिनीसाठी हाणामारी सुरू आहे. बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दुसरीकडे, मुंबई हायकोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करत स्वत:हून याचिका दाखल केली, त्यावरही सुनावणी सुरू आहे.
अक्षय शिंदेच्या डोक्याला गोळी लागली. अशा प्रश्नांना पोलिसांनी गोळीबार आणि हत्येचा आधार मानला. तीन गोळ्या झाडल्या तर उरलेल्या दोन गोळ्या कुठे गेल्या? चार पोलीस एका व्यक्तीवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते का? असा सवाल करत ज्या पोलिसाला गोळी लागली त्याचा लागलेली गोळी आरपार गेली की घासून गेली, असाही सवाल न्यायाधीशांनी केला. न्यायाधीशांनी पोलिसांना अक्षयने खेचले ते पिस्तुल होते की रिव्हॉल्व्हर होते, असा पहिला सवाल केला. यावर सरकारी वकिलांनी ते पिस्तूल होते असे सांगताच न्यायाधीशांनी दुसरा प्रश्न केला.
या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आणि तपासात दिरंगाई केल्याबद्दल बदलापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. बदलापूर अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तब्बल १२ तास लावल्याचा आरोप पीडित चिमुकलीच्या आईने केला. शुभदा शितोळे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. तसेच या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, एसआयटी बरखास्त झाली आहे, असं ते म्हणाले. यानंतर न्यायालयानं १९ डिसेंबरला प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवली असल्याचं त्यांनी सांगितलं.
कुर्ला बेस्ट अपघाताला जबाबदार कोण? आरटीओ आणि बेस्टचा अहवाल आला समोर