Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik TCS Conversion Case: निदा खानला आश्रय देणारा कोण आहे MIM चा नगरसेवक?

Nashik TCS Conversion Case- निदा खानच्या अटकेनंतर या कथित धर्मांतरण रॅकेटचे आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय संबंध आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 08, 2026 | 02:29 PM
Nida Khan, Nashik TCS Case, Religious Conversion, Nashikroad Court,

Nida Khan, Nashik TCS Case, Religious Conversion, Nashikroad Court,

Follow Us
Follow Us:
  • निदा खानला फरार काळात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात उघड
  • तीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वीच नारेगाव परिसरात एक नवीन फ्लॅट खरेदी केला होता
  • मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांचा मोबाईल फोन जप्त
 

Nashik TCS Conversion Case: नाशिकमधील टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या निदा खानला आज (8 मे) छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. तिच्या अटकेनंतर आता एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. निदा खानला ४० दिवसांपासून फरार होती. पण संभाजीनगरमध्ये लपून राहण्यासाठी तिला एमआयएम (MIM)चे नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आले आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी आता मतीन पटेल यांनाही नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईल फोन जप्त केला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या 5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसली होती. या काळात ती नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आली. मतीन पटेल यांच्याशी संपर्क झाल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरला गेली. दरम्यान मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वीच नारेगाव परिसरात एक नवीन फ्लॅट विकत घेतला होता. याच घरात पटेल यांनी निदा खानला आश्रय दिला.

Nashik TCS Conversion Case: फरार निदा खान अखेर जेरबंद! संभाजीनगरमध्ये मध्यरात्री मोठी कारवाई

तपासादरम्यान, निदा खान पटेल यांच्या नारेगाव परिसरातील फ्लॅटमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी तातडीने संभाजीनगर पोलिसांना ही माहिती कळवली. माहिती मिळताच संभाजीनगर स्थानिक पोलिस आणि नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिवस या इमारतीवर पाळत ठेवली. निदा खान या फ्लॅटमध्ये लपून बसल्याची खात्री पटताच मध्यरात्री छापा टाकून निदा खानला ताब्यात घेतले.

अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कारवाई

दरम्यान, निदा खानने स्वतःला गरोदर असल्याचे सांगत वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, नाशिक जिल्हा न्यायालयाने हे प्रकरण केवळ वैयक्तिक वाद नसून एका “आंतरराष्ट्रीय सिंडिकेट”शी संबंधित असल्याचे निरीक्षण नोंदवत तिचा जामीन अर्ज वारंवार फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी तिला अटक केली. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता वेग मिळण्याची शक्यता आहे.

Nashik TCS Case : लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या कटाचे .

दोन आरोपींना पुन्हा पोलिस कोठडी

याशिवाय या प्रकरणातील इतर दोन आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांनाही पुढील तपासासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मुंबई नाका पोलिसांकडून दोघांची कसून चौकशी सुरू असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पीडितांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही दोघांवर करण्यात आला आहे. याशिवाय फिर्यादीला दिलेल्या कथित गुंगीकारक पदार्थाचा स्रोत, बँक व्यवहार, आर्थिक फंडिंग आणि संभाव्य नेटवर्क याबाबतही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

तपासात आणखी खुलास्यांची शक्यता

निदा खानच्या अटकेनंतर या कथित धर्मांतरण रॅकेटचे आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय संबंध आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. आर्थिक व्यवहार, संपर्कातील व्यक्ती आणि डिजिटल पुरावे तपासले जात असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Who is the mim corporator who gave shelter to nida khan in the nashik conversion case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 02:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.