Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोड आलेले हरभरे खाल्याने पत्नीला राग अनावर; करंगळीचा चावा घेतला अन् मिक्सरच्या भांड्याने…

Pune Crime: पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराने घरात मोड आलेले हरभरे ठेवले होते. पतीने ते खाल्ले.  यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 04, 2024 | 09:15 AM
मोड आलेले हरभरे खाल्याने पत्नीला राग अनावर; करंगळीचा चावा घेतला अन् मिक्सरच्या भांड्याने...

मोड आलेले हरभरे खाल्याने पत्नीला राग अनावर; करंगळीचा चावा घेतला अन् मिक्सरच्या भांड्याने...

Follow Us
Close
Follow Us:

Pune Crime News: घरात भिजवलेले (मोड आलेले) हरभरे  खाल्याने पत्नीने पतीला लाटण्याने व मिक्सरच्या भांड्याने मारहाण करत त्याच्या करंगळीचा चावा घेऊन नख तोडल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार पेठेत घडला. या प्रकरणी सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या ४० वर्षीय पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक डिसेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराने घरात मोड आलेले हरभरे ठेवले होते. पतीने ते खाल्ले.  यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले. वादानंतर पत्नीने पतीला शिवीगाळ केली. त्याला लाटण्याने मारहाण केली. पत्नीने लाटण्याने तळ हातावर, डोक्यात, पाठीवर मारले. तसेच, हाताच्या नखांनी तोंडावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे पोटाला ओरखडले. त्यावेळी तक्रारदाराने पत्नीच्या हातातील लाटणे हिसकावून घेतले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने मिक्सरचे भांडे घेऊन दोन वेळा तक्रारदाराच्या डोक्यात मारले. नंतर पत्नीने तक्रारदाराची पँन्ट खाली ओढली. यामुळे तक्रारदार खाली बसले. पत्नी मारहाण करीत असताना स्व रक्षणासाठी तक्रारदाराने दोन्ही हात वर करून डोके झाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तक्रारदाराच्या पत्नीने हाताच्या करंगळीला चावून नख तोडले. घटनेनंतर घाबरलेल्या पतीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात भररस्त्यात हत्येचा थरार!

शाळकरी मुलांमध्ये वादावादी होऊन एकमेकांच्या हत्येचा प्रयत्न होत असतानाच पुर्ववैमन्यासातून १७ वर्षीय एका मुलाचा दोघांनी भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.  कॉलेजला जात असताना त्याला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याचे सांगण्यात आले आहे. भल्या सकाळी वानवडीतील रामटेकडी येथे मंगळवारी ही घटना घडली आहे. याघटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.यश सुनील घाटे (वय १७, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी साहिल लतीफ शेख (वय १८) व ताहीर खलील पठाण (वय १८, रा. रामटेकडी, हडपसर) यांना अटक केली आहे. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात यशचा भाऊ प्रज्वल सुनील घाटे (वय २०) याने तक्रार दिली आहे.

हेही वाचा: Crime News: पुण्यात भररस्त्यात हत्येचा थरार! मुलावर कोयत्याने सपासप वार, कारण वाचाल तर…

पोलिसांच्या माहितीनुसार, यश घाटे हा हडपसर परिसरातील एका खासगी महाविद्यालयात शिकत होता. तर, आरोपी त्याच्याच परिसरात राहणारे आहेत. त्यांच्यात यापुर्वी वाद झाले होते. एकमेकांकडे पाहण्यावरून हे वाद झालेले होते. त्यावेळी यश याचा भाऊ प्रज्वल याने तो वाद मिटवला देखील होता.या दरम्यान, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास यश घाटे व त्याचे मित्र आदित्य चव्हाण, रेहान पठाण तसेच श्रेयश शिंदे असे जामा मस्जिदसमोरून रामटेकडी येथून कॉलेजला जात होते. त्यावेळी साहिल शेख व ताहीर पठाण यांनी  जुन्या भांडणाचा राग मनात धरून यशला अडवले.

Web Title: Wife beaten husband because husband eat sprouts pune crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 09:12 AM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.