पुण्यात भररस्त्यात लहान मुलाची हत्या (फोटो- istockphoto)
पोलिसांच्या माहितीनुसार, यश घाटे हा हडपसर परिसरातील एका खासगी महाविद्यालयात शिकत होता. तर, आरोपी त्याच्याच परिसरात राहणारे आहेत. त्यांच्यात यापुर्वी वाद झाले होते. एकमेकांकडे पाहण्यावरून हे वाद झालेले होते. त्यावेळी यश याचा भाऊ प्रज्वल याने तो वाद मिटवला देखील होता.या दरम्यान, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास यश घाटे व त्याचे मित्र आदित्य चव्हाण, रेहान पठाण तसेच श्रेयश शिंदे असे जामा मस्जिदसमोरून रामटेकडी येथून कॉलेजला जात होते. त्यावेळी साहिल शेख व ताहीर पठाण यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून यशला अडवले.
तसेच, त्याठिकाणी त्याच्याशी वाद घालत त्याच्यावर कोयत्याने सपासप वारकरून त्याची हत्या केला. भल्या सकाळी घडलेल्या याघटनेने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पसार झालेल्या साहिल व ताहीर यांना शोध घेऊन पकडले देखील. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.सायबर चोरट्यांचा तरुणाला 75 लाखांचा गंडा
सायबर चोरटे वेगवेगळी आमिषे दाखवत नागरिकांची फसवणूक करत असून वेगवेगळ्या घटनेत तब्बल ७५ लाख रुपयांची रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची २५ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ३९ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे.
पुण्यातील क्राईमच्या बातम्या इथे वाचा
तक्रारदार कोथरूड भागात राहण्यास असून, ते खासगी नोकरी करतात. चोरट्यांनी त्यांना मोबाइलवर संपर्क साधला. फिनवेस्ट कंपनीतून बोलत आहे. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. विश्वास संपादन केल्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानूसार, तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. सुरुवातीला परताव्यापोटी काही रक्कम दिली. मात्र, नंतर पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले. तेव्हा तरुणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.