Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीच्या हत्येने गुवाहाटी हादरलं; फ्रिजमध्ये मुंडकं, आरोपी म्हणतो ‘माफी मागणार नाही’,‘बाहेर आलो तर तिच्या शुगर डॅडीलाही…’

गुवाहाटीतील एका फ्लॅटमध्ये पोलिसांना आढळलेल्या दृश्याने संपूर्ण तपास पथक हादरले. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने केलेल्या कृत्याचा उलगडा होताच प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले. चौकशीत आरोपीने पश्चात्ताप नसल्याचे सांगत भविष्यातही एका व्यक्तीला लक्ष्य करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 11, 2026 | 03:07 PM
पत्नीच्या हत्येने गुवाहाटी हादरलं; फ्रिजमध्ये मुंडकं, आरोपी म्हणतो ‘माफी मागणार नाही’,‘बाहेर आलो तर तिच्या शुगर डॅडीलाही…’

पत्नीच्या हत्येने गुवाहाटी हादरलं; फ्रिजमध्ये मुंडकं, आरोपी म्हणतो ‘माफी मागणार नाही’,‘बाहेर आलो तर तिच्या शुगर डॅडीलाही…’

Follow Us
Follow Us:
  • पती-पत्नीच्या वादानंतर घडलेल्या घटनेने तपासाला वेगळे वळण
  • पोलिसांना फ्लॅटमध्ये आढळलेल्या पुराव्यांमुळे वाढली खळबळ
  • चौकशीत आरोपीच्या वक्तव्याने पोलिसांसमोर नवा प्रश्न
गुवाहाटी: आसाममधील गुवाहाटीच्या बेलतोला भागात २४ वर्षीय रिया तालुकदार गोस्वामी हिची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप असून, तपासादरम्यान आरोपीने केलेल्या वक्तव्यांमुळे पोलिसांसमोरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणी रामानुज गोस्वामी याला पोलिसांनी अटक केली आहे. रिया आणि रामानुज यांचा विवाह गेल्या वर्षी २२ सप्टेंबर रोजी झाला होता. मागील सहा महिन्यांपासून दोघेही गुवाहाटीतील बेलतोला परिसरातील बसिष्ठापूर बाय-लेन क्रमांक ४ येथील फ्लॅटमध्ये राहत होते. रामानुज हा कॅब चालक आहे.

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, रामानुजला पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. यावरून ३ सप्टेंबर रोजी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत सुरू होता. त्यानंतर रागाच्या भरात रामानुजने धारदार शस्त्राने रियाची हत्या केल्याचा आरोप आहे. दोन दिवस रियाचा कुटुंबीयांशी संपर्क न झाल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रात्री सुमारे ९.४५ वाजता हाटीगाव पोलीस ठाण्याचे पथक फ्लॅटवर पोहोचले. घराचा दरवाजा उघडा होता. आत गेल्यानंतर पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात रियाचा मृतदेह आढळला.

हेही वाचा: Ahilyanagar Accident: एकाच दिवशी ३ जिल्ह्यांसाठी काळा दिवस; तीन अपघातांत २१ जणांचा बळी

फ्रिजमध्ये आढळले मुंडके

पोलिसांच्या तपासात रियाचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आल्याचे समोर आले. तिचे कापलेले मुंडके काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. तिच्या हाताची बोटेही कापण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेले ‘दाओ’ हे धारदार शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे. हत्येनंतर मृतदेह कुत्र्याला खाऊ घालण्याची योजना आरोपीने आखली होती, असा दावा चौकशीदरम्यान समोर आला आहे. मात्र, मृतदेहाचे भाग कुत्र्याला खाऊ घातल्याच्या दाव्याला अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे डीसीपी तब्बू राम पेगू यांनी सांगितले.

२० हून अधिक वेळा रिहॅब सेंटरमध्ये

तपासादरम्यान रामानुजच्या व्यसनाधीनतेची माहितीही समोर आली आहे. तो २० पेक्षा अधिक वेळा नशामुक्ती केंद्रात दाखल झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीत तो एचआयव्ही आणि हेपेटायटिस सीने संक्रमित असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना; अन्नविषबाधेत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

‘पश्चात्ताप नाही’, आरोपीचे पोलिसांना वक्तव्य

हत्येनंतर रामानुज स्वतः पोलिसांसमोर शरण आला. चौकशीदरम्यान त्याने आपल्या कृत्याचा पश्चात्ताप नसल्याचे सांगितल्याची माहिती आहे. तसेच तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पत्नीशी संबंधित एका व्यक्तीला लक्ष्य करण्याची धमकीही त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या स्थानिक न्यायालयाने रामानुजला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सीआयडी, फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांचे पथक घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे. हत्येमागील नेमका घटनाक्रम, आरोपीचा हेतू आणि इतर बाबींचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Wifes murder in guwahati body parts severed severed head found in fridge sugar daddy shows no remorse before police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 03:07 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.