crime (फोटो सौजन्य- social media)
राज्यात गुन्हेगारीचा प्रमाण वाढत चालले आहे. आता धुळे शहरात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाचो किंमत सध्याच्या बाजारात २ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई शहरातील चक्करबर्डी परिसरात करण्यात आली आहे.
लग्नासाठी तगादा लावल्याने प्रेयसीचा गळा दाबून खून; आरोपीला जन्मठेप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टॉकीजवळील चक्करबर्डी परिसरात एक जण गांजाची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती, पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचत गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयीतास शिताफीने ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव गणेश सुरेशसिंग परदेशी (रा. बुंदेलपुरा, नांदगाव रोड, येवला, जि. नाशिक) असे सांगितले. त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोहेकॉ रविकिरण राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत गणेश परदेशी याने हा गांजा शिरपूर तालुक्यातील पिरपाणी येथील सुनील पावरा यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली देत तो गांजा तारगल्ली, येवला येथील विष्णु बडोदे उर्फ पंडोरे याला देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी यावेळी दिली.