Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Laxman Hake Attack: लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याचा प्रयत्न; जरांगें पाठलांवर गंभीर आरोप ,हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?..

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर सोलापुरात हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. पाकणी फाट्यावरील हॉटेलमध्ये काही तरुणांनी हुज्जत घालत हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा हाकेंचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून, हल्लेखोर मनोज जरांगे यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा हाकेंनी केला आह

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 12, 2026 | 01:09 PM
Laxman Hake Attack: लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; ‘हे सगळे जरांगेंचे कार्यकर्ते’, हाकेंचा आरोप ,हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

Laxman Hake Attack: लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; ‘हे सगळे जरांगेंचे कार्यकर्ते’, हाकेंचा आरोप ,हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • पाकणी फाट्यावरील हॉटेलमध्ये लक्ष्मण हाकेंवर हल्ल्याचा प्रयत्न
  • ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, हाकेंचा आरोप
  • हल्लेखोर जरांगे समर्थक असल्याचा आरोप
सोलापूर: ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर सोलापुरात हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी फाटा येथील हॉटेल निसर्गमध्ये हाके हे आपल्या सहकाऱ्यांसह भोजनासाठी थांबले असताना काही तरुणांनी त्यांच्याशी हुज्जत घातल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर हॉटेल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी या प्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके हे आपल्या सहकाऱ्यांसह पाकणी फाटा येथील हॉटेल निसर्गमध्ये जेवणासाठी थांबले होते. त्यांच्यासोबत पोलिस कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी काही तरुण हॉटेलमध्ये आले आणि हाके यांच्याशी हुज्जत घालू लागल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉटेलचा दरवाजा लावून घेतल्याचे हाके यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून संबंधित तरुणांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा: छत्रपती संभाजीनगर हादरले; लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याचा राग अनावर, मेडिकलमध्ये घुसून चालकावर चाकूने वार, अन्…

‘हे सगळे जरांगेंचे कार्यकर्ते’; हाकेंचा आरोप

या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना हल्ल्याचा प्रयत्न करणारे तरुण हे मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला. संबंधित तरुण दारूच्या नशेत असल्याचाही दावा त्यांनी केला. हाके यांच्या म्हणण्यानुसार, ते जेवण्यासाठी थांबले असताना सुरुवातीला एक व्यक्ती त्यांचा व्हिडीओ शूट करत होती, तर काही जण त्यांच्याशी हुज्जत घालत होते. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. पोलिस बंदोबस्त असतानाही आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा हाके यांनी केला.

‘ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न’

हल्ल्याच्या कथित घटनेनंतर हाके यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. हा केवळ आपल्यावरील हल्ला नसून ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आपल्यावर यापूर्वीही हल्ले झाल्याचा दावा त्यांनी केला. “लक्ष्मण हाकेचा जीव गेला तरी आम्ही ओबीसीचा आवाज थांबवणार नाही,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. ओबीसी नेत्यांवर हल्ले करून आरक्षण मिळवता येणार नाही, असेही हाके यांनी म्हटले.

हेही वाचा: नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर प्रशिक्षणार्थीचा बॅरेकमध्ये मृत्यू; २० वर्षीय अश्विनच्या मृत्यूचे कारण…

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून सध्या वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू असून, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे आंदोलन नेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सोलापुरातील ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून, घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी, हल्ल्याचा प्रयत्न झाला का आणि संबंधित तरुणांचा या घटनेशी नेमका संबंध काय, याचा तपास केला जात आहे. हाके यांनी केलेला ‘जरांगे समर्थक’ असल्याचा आरोप पोलिस तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील अधिकृत माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

 

 

Web Title: Youths attack obc leader laxman hake in solapur claim to be jarange supporters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 12:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.