Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Election Results : तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीत फुलतंय ‘कमळ’; आम आदमी पक्ष कमालीच्या पिछाडीवर

Delhi Election Result 2025 Highlights Updates : भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे तर आम आदमी पक्षाने 28 जागांची आघाडी घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्लीत तब्बल 27 वर्षांनंतर 'कमळ फुलताना' दिसत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 08, 2025 | 11:24 AM
लोकसभा, विधानसभेनंतरही भाजपमध्ये इन्कमिंग सुरुच; 'या' बड्या नेत्याने केला पक्ष प्रवेश

लोकसभा, विधानसभेनंतरही भाजपमध्ये इन्कमिंग सुरुच; 'या' बड्या नेत्याने केला पक्ष प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी मतदानही झाले. त्यानंतर आता या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज (दि.८) घेतली जात आहे. सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यात भाजप 42 जागांवर आघाडीवर आहे तर आम आदमी पक्षाने 28 जागांची आघाडी घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्लीत तब्बल 27 वर्षांनंतर ‘कमळ’ फुलताना दिसत आहे.

हेदेखील वाचा : Delhi Election Results : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु; अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया पिछाडीवर

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाले होते. मतदानानंतर आम आमदी पार्टी आणि भाजपनेही विजयाचा दावा केला आहे. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज भाजपच्या बाजूने गेले आहेत. त्यातच आता भाजपने आघाडी घेतल्याचे दिसत असून, यामध्ये बहुमताचा आकडा पार केल्याचे दिसत आहे. तर काँग्रेसला अद्याप एकही जागा जिंकता अथवा आघाडी दिसली नाही. दरम्यान, मतमोजणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दिल्लीतील ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. दिल्ली सचिवालयातील उच्च अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यालयात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी कागदपत्रे आणि डेटा संरक्षित करण्यास सांगितले आहे.

ग्रेटर कैलाश मतदारसंघांत मतमोजणीच्या चौथ्या फेरीनंतर, भाजपच्या शिखा राय ४ हजारांहून अधिक मतांनी पुढे आहेत. आम आदमी पक्षाचे सौरभ भारद्वाज येथे सातत्याने आघाडी राखत होते, परंतु सध्या ते मागे पडले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली असून ‘आप’ पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. मुस्लीमबहुल मतदारसंघातही भाजपाने आघाडी घेतली आहे. ओखला या मतदारसंघात आजवर भाजपाचा विजय झालेला नव्हता. याठिकाणी भाजपचे मनीष चौधरी आघाडीवर आहेत. तर मुस्तफाबाद येथे भाजपाचे मोहन सिंह बिश्ट आघाडीवर आहेत. हा भाजपचा मोठा विजय मानला जात असून आपला धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच समोर येणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. येत्या पाच वर्षांत दिल्ली कोणाच्या ताब्यात राहणार हे चित्र दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होऊ शकते. बहुतांश एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाची पिछेहाट झाल्याचे दिसून आले असून, भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत भाजपने आघाडी कायम ठेवली आहे.

भाजप समर्थकांचा जल्लोष सुरू

दरम्यान, भाजप समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. भाजप ४२ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २८ जागांवर आघाडीवर आहे. दिल्ली विधानसभेच्या जागेवर भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात जोरदार लढत आहे. दुसऱ्या फेरीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांना २५४ मतांनी मागे टाकले आहे.

Web Title: Bjp is now leading in delhi election may win election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • Delhi Election 2025

संबंधित बातम्या

Arvind Kejriwal : ‘दिल्लीपासून बिहारपर्यंत …’, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडीला धक्का
1

Arvind Kejriwal : ‘दिल्लीपासून बिहारपर्यंत …’, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडीला धक्का

पोटनिवडणुकीच्या निकालांनी ‘आप’चे वाढवले मनोबल; पुन्हा विजयाकडे वाटचाल करण्याच्या तयारीत
2

पोटनिवडणुकीच्या निकालांनी ‘आप’चे वाढवले मनोबल; पुन्हा विजयाकडे वाटचाल करण्याच्या तयारीत

“भाजपच्या मांडीवर कॉंग्रेस बसलाय….धोकेबाज पक्ष; अरविंद केजरीवाल नेमके भडकले का?
3

“भाजपच्या मांडीवर कॉंग्रेस बसलाय….धोकेबाज पक्ष; अरविंद केजरीवाल नेमके भडकले का?

‘मी राज्यसभेत जाणार…’, लुधियाना पोटनिवडणुकीत ‘आप’च्या विजयानंतर अरविंद केजरीवाल पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार?
4

‘मी राज्यसभेत जाणार…’, लुधियाना पोटनिवडणुकीत ‘आप’च्या विजयानंतर अरविंद केजरीवाल पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.