महाराष्ट्रातील अराजकतेला मुख्यमंत्री जबाबदार; माजी मुख्यमंत्र्यांनी केली टीका
मुंबई : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आम आदमी पक्ष, कॉंग्रेस व भाजप अशी प्रमुख तीन पक्षांची जोरदार लढत होत आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार असून 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष राजधानी दिल्लीकडे लागले आहे. दिल्ली निवडणुकीचे महाराष्ट्रामध्ये पडसाद पडत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये देखील पाठिंब्यावरुन राजकारण रंगले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेस विरुद्ध आप अशी लढत होणार आहे. देशाच्या पातळीवर लोकसभा निवडणुकीवेळी इंडिया आघाडी दिसून आली होती. मात्र त्यानंतर कोणत्याही निवडणुकीमध्ये त्यांची एकी दिसून आली नाही. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आप विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत होताना दिसत आहे. यावर महाराष्ट्रातील जेष्ठ कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आप विजयी होई असे वक्तव्य केले होते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा झाली आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये देखील यावर वादंग होताना दिसून आला. यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
जेष्ठ कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडियावप पोस्ट करुन लिहिले आहे की, दिल्ली विधानसभा निवडणुकीवरील माझ्या विधानांचा संदर्भाबाहेर अर्थ लावण्यात आला. जर इंडिया अलायन्स एकत्र लढले असते तर अलायन्सचा विजय निश्चित झाला असता. आता सर्व प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्याने, ही एक खुली निवडणूक बनली आहे. काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली आहे आणि मला खात्री आहे की आपण विजयी होऊ, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या एका क्लिकवर
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, “दिल्लीच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. मला विश्वास आहे की तिथे अरविंद केजरीवाल जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे आणि निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस आणि आपमध्ये युती व्हायला हवी होती. मात्र तसे होताना दिसत नाही”, अशी खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली होती. यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जोरदार टीका टिप्पणी करण्यात आली.
आप दिल्लीमध्ये मारणार हॅटट्रिक?
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आप पक्ष जोरदार प्रचार करत आहे. आप नेते अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना या जोरदार प्रचार करत आहेत. तसेच भाजपवर निशाणा देखील साधत आहेत. अरविंद केजरीवाल हे दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.अरविंद केजरीवाल यांना विरोधी इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्ष समाजवादी पक्ष आणि तृणूल काँग्रेस यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्याचबरोबर आम आदमी पक्षाने भाजपला पहिला धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाने भाजपच्या मंदिर सेलला सुरूंग लावला आहे. बुधवारी (8 जानेवारी) अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत भाजपच्या मंदिर सेलच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांची ताकद वाढताना दिसत आहे.