राजधानी दिल्लीत प्रदूषणापासून मिळेना दिलासा; अनेक भागात AQI 400 पार
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच राजधानीत दिल्लीत हवेची गुणवत्ता चांगलीच बिघडली आहे. दिल्लीतील हवा विषारी बनली असून, परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी GRAP-4 ही लागू करण्यात आला आहे. असे असताना राजधानी दिल्लीतील अनेक भागांत AQI 400 पार झाल्याचेही दिसून येत आहे.
हेदेखील वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष करण्यासाठी अजित पवारांनी कसली कंबर; दिल्लीतून केली ‘ही’ मोठी घोषणा
दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. शुक्रवारी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ‘अत्यंत खराब’ श्रेणीमध्ये नोंदवला गेला. दिल्लीचा सरासरी AQI सकाळी 7 वाजता 332 नोंदवला गेला, तर काही भागात AQI ने 400 ची ‘गंभीर’ पातळीही ओलांडली. दिल्ली एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. दिल्ली-एनसीआरमधील इतर शहरांमध्येही हवेची गुणवत्ता खालावली असून, याबाबतची आकडेवारीही समोर आली आहे. त्यानुसार, ग्रेटर नोएडामध्ये 272, गाझियाबादमध्ये 258, नोएडामध्ये 249, गुरुग्राममध्ये 258 आणि फरिदाबादमध्ये 166 AQI नोंदवण्यात आला.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) नुसार, 0-50 AQI ‘चांगले’, 51-100 ‘समाधानकारक’, 101-200 ‘मध्यम’, 201-300 ‘खराब’, 301-400 ‘अत्यंत खराब’, 401 -450 ‘गंभीर’ आणि 450 पेक्षा जास्त ‘गंभीर प्लस’ मानले जाते. दरम्यान, दिल्लीला गुरुवारी या हंगामातील सर्वात थंड रात्रीचा सामना करावा लागला, जेव्हा किमान तापमान 10.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते.
दिल्लीत GRAP-4 लागू
दिल्लीतील वायू प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. याला सामोरे जाण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते की, पुढील सुनावणीपर्यंत शाळांशी संबंधित नसलेले सर्व Grape-4 उपाय लागू राहतील. याशिवाय ग्रेप-4 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. यावर न्यायालयाने अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला होता. यासोबतच राज्य सरकारांना बांधकामावरील बंदीमुळे बाधित झालेल्या बांधकाम कामगारांसाठी जमा झालेला श्रम उपकर वापरण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दिल्लीत अनेक निर्बंध लागू
अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे किंवा एलएनजी, सीएनजी, बीएस-IV सारखे स्वच्छ इंधन वाहून नेणारे डिझेल किंवा विजेवर चालणारे वगळता, GRAP-4 अंतर्गत अधिकाऱ्यांनी अनेक निर्बंध लादले आहेत.
GRAP 4 लागू केल्यानंतर काय होणार बदल?
हेदेखील वाचा : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता बिघडली; आजपासून GRAP 4 केला जाणार लागू, ‘या’ वाहनांना बंदी