लोकसभा, विधानसभेनंतरही भाजपमध्ये इन्कमिंग सुरुच; 'या' बड्या नेत्याने केला पक्ष प्रवेश
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला असून भाजप 27 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा सत्तेवर परतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने दिल्लीची निवडणूक लढवली आणि मोदींच्या प्रसिद्धिचाही या निवडणुकीत फायदा झाल्याचं सांगितलं जात आहे. मोदींची लोकप्रियता, 12 लाख रुपये करमुक्तीचा निर्णय आणि मोदींचं गंगास्नान पथ्थ्यावर पडल्याचं सांगितलं जात आहे. आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांचा व्यक्तिगत पराभव देखील या विजयात महत्त्वाचा मानला जात आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने देशभरात अनेक राज्यांमध्ये निवडणूक लढवली, ज्यानंतर 8 राज्यांमध्ये भाजपने युती सरकार स्थापन केले. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांचा समावेश होता. भाजपने आता देशभरातील 19 राज्यांमध्ये युती सरकार स्थापन केले आहेत.
२०१८ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने २१ राज्यांमध्ये सरकार स्थापन केलं होतं. काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळातच असा एक विक्रम केला होता. एनडीएने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये सरकार स्थापनेत यश मिळवून इंदिरा गांधींच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण जरी त्यात हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये युतीची कमी झाली असती, तरी भाजपची पकड युक्तीच्या रुपात नाकारता येणार नाही.
आता बिहारवर लक्ष असणार आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 2025 च्या नोव्हेंबरमध्ये संपत आहे. यापूर्वी 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने 30 जागांवर विजय मिळवला होता, तर इंडिया आघाडीला 9 जागा मिळाल्या. बिहारमधील राजकीय बदल आणि भाजपचे वर्चस्व अधिक बळकट होण्याच्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचा २७ वर्षांचा वनवास संपला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा पराभव केला आहे. भाजपच्या त्सुनामीत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांसारखे पक्षाचे मोठे चेहरेही पराभूत झाले. दिल्लीत भाजपने ४8 जागा जिंकून स्पष्ट जनादेश मिळवला आहे.
भारत जोडो अभियानाचे संयोजक आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी हा आम आदमी पक्षाचा पराभव नसून संपूर्ण विरोधी पक्षाचा पराभव असल्याचं म्हटलं आहे. योगेंद्र यादव म्हणाले, ‘हा पराभव केवळ ‘आप’साठीच नाही तर भारतीय राजकारणात पर्यायी राजकारणाचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वांसाठी धक्का आहे. आम आदमी पक्षाचा १० वर्षांनी पराभव झाला आणि केवळ ५ टक्के मतांचा फरक पडला असं, आपला वाटू शकतं. परंतु जेव्हा पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या जागा गमावतात तेव्हा तो केवळ एक सामान्य पराभव नसून एक मोठा इशारा असतो. भाजप इथेच थांबणार नाही आणि आम आदमी पक्षाला आणखी तोडण्याचा प्रयत्न केला जाईल.