Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माता-भगिनी, कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी मी धारकरी…”; महेश लांडगेंचा विरोधकांना गर्भित इशारा

मी तळागाळातला नेता आहे. नगरसेवक म्हणून काम करताना माझ्याकडे काम घेऊन आलेल्या कोणत्याही व्यक्तीला मी जात, धर्म, मुख्य म्हणजे त्यांचा पक्ष  पाहून मदत केली नाही, असे महेश लांडगे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 08, 2024 | 07:30 PM
"माता-भगिनी, कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी मी धारकरी..."; महेश लांडगेंचा विरोधकांना गर्भित इशारा

"माता-भगिनी, कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी मी धारकरी..."; महेश लांडगेंचा विरोधकांना गर्भित इशारा

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्यातील भोसरी मतदारसंघात वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. विरोधकांनी आरोप करताना अक्षरशः पातळी सोडली आहे. माझ्या कार्यकर्त्यांना वाटते की मी विरोधकांच्या आरोपांना उत्तर द्यावे. पण, मी पातळी सोडून बोलणार नाही. मी आरोपांना उत्तर देणार नाही माझ्याकडे पुरावे आहेत मी काम मांडत राहणार विरोधकांना त्यांचे उत्तर मिळेल. पण, माझ्या कार्यकर्त्यांना कोणी त्रास देणार असेल, तर माझी विरोधकांना विनंती आहे की, माझा मूळ स्वभाव जागा करु नका. १३ दिवसांत निवडणूक होईल. माझ्या एकाही कार्यकर्त्याला त्रास दिला, तर २० तारखेनंतर माझा स्वभाव बदलणार. माझ्या माता-भगिनी आणि कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी मी ‘‘धारकरी’’ आहे, हे लक्षात ठेवा, असा गर्भीत इशारा आमदार महेश लांडगे यांनी  दिला आहे.

महायुतीच्या भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ दिघी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे , आमदार उमा खापरे, अमित गोरखे, कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ नेते दत्ताआबा गायकवाड, माजी उपमहापौर हिरानानी घुले, भाजपा निवडणूक प्रमुख विकास डोळस, समन्वयक विजय फुगे, माजी नगरसेवक निर्मला गायकवाड, माजी नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, केशव घोळवे, शिवसेनेचे इरफान सय्यद, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा कविता आल्हाट, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, सुसंस्कृत नेत्यांनी माझ्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू केला आहे. मला बरेच जणांनी सांगितले की याबाबत बोलले पाहिजे. पण मी सुसंस्कृत नेत्यांबद्दल बोलायचे सोडूनच दिले आहे.सुसंस्कृत नेत्यांना आपण जास्त बोलणे उचित ठरणार नाही असे मला वाटते. विरोधकांना असे वाटते की आरोप केले की नागरिक निवडून देतील. पण केवळ आरोप करून आपण सिद्ध होत नाही कर्तुत्वातून आपल्याला सिद्ध व्हावे लागते. सुसंस्कृत उच्चशिक्षित लोकांचा खरेच अभ्यास असेल तर त्यांनी या वाक्याचा नक्की अभ्यास करावा.

हेही वाचा: मविआची याला पाडा अन् त्याला गाडा ही कुठली संस्कृती? पंकजा मुंडे यांचा सवाल

महेश लांडगे पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून दिघी परिसरात काम करत आहे.  महेश लांडगे म्हणाले २०१४ मध्ये मी अपक्ष निवडणुकीला सामोरे गेलो. मी तळागाळातला नेता आहे. नगरसेवक म्हणून काम करताना माझ्याकडे काम घेऊन आलेल्या कोणत्याही व्यक्तीला मी जात, धर्म, मुख्य म्हणजे त्यांचा पक्ष  पाहून मदत केली नाही. माझ्याकडे समस्या घेऊन आलेल्या कोणत्याही घटकाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी मदत केली, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.

Web Title: Bhosari mahayuti candidate mahesh landge criticizes on mva for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 07:29 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • mahesh landge

संबंधित बातम्या

आसमंती भिनला, दाही दिशा घुमला…’शंभुराजे शंभुराजे’ जयघोष! जगातील सर्वांत उंच शिल्प ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’
1

आसमंती भिनला, दाही दिशा घुमला…’शंभुराजे शंभुराजे’ जयघोष! जगातील सर्वांत उंच शिल्प ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’

पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता…; आमदार लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
2

पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता…; आमदार लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

PCMC Politics: पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ‘देवेंद्र पर्व’; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या विविध विकासकामांचे लोकार्पण
3

PCMC Politics: पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ‘देवेंद्र पर्व’; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या विविध विकासकामांचे लोकार्पण

पिंपरी चिंचवडमध्ये “कमळ”च फुलणार! आगामी महापौर भाजपाचाच; आमदार महेश लांडगेंचा दावा
4

पिंपरी चिंचवडमध्ये “कमळ”च फुलणार! आगामी महापौर भाजपाचाच; आमदार महेश लांडगेंचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.