Nashik Phata Khed Corridor: थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन निर्देशानुसार, 'एमएसआरडीसी'कडे उपलब्ध असलेल्या २०० कोटी रुपयांच्या बिगरवापर (अनयुज्ड) निधीतून १७५ कोटी रुपये नगरविकास विभागामार्फत 'पीएमआरडीए'कडे हस्तांतरित केले जाणार आहेत.
मेट्रो कनेक्टिव्हिटीचा हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून, त्यांच्या उपस्थितीत लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय बाबीचा सविस्तर आढावा…
पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील लाखो नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. चिखली किंवा मोशी परिसरात एक सुसज्ज आणि आधुनिक एसटी बस स्थानक उभारण्याच्या मागणीची राज्य शासनाने तातडीने दखल…
पिंपरी- चिंचवड महापालिकेचे नवीन प्रशासकीय भवन आणि 'अजितसृष्टी' या दोन्ही प्रकल्पांचे काम पूर्ण करून त्यांचे एकत्रित लोकार्पण व्हावे, अशी अपेक्षा महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
भविष्यातील महावितरणची वाढीव वीज मागणी लक्षात घेऊन प्रस्तावित उपकेंद्रे व क्षमतावाढीची कामे करण्यात येत आहेत. निधीअभावी महापारेषणचे कोणतेही काम प्रलंबित नाही, असे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडकरांची भूमिका सभागृहात मांडणार आहे. त्यासाठी विविध १५ मुद्यांवर आम्ही तयारी केली आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बांगलादेशी नागरिक आढळून आल्यामुळे कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कारवाई करण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निर्देश दिले आहेत.
पुणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यास उत्तर पुणे जिल्ह्याला ‘शिवनेरी जिल्हा’ असे नाव द्यावे, अशी जाहीर मागणी आमदार लांडगे यांनी केली होती. या मागणीला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला
पिंपरी चिंचवडकरांसह तमाम वारकरी संप्रदायासाठी श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या सुधार प्रकल्पाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता अखेर मिळाली आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या सुधारणांनंतर काही पदवीधर शिक्षकांचे वेतन पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर आता पदवीधर शिक्षकांना योग्य वेतनश्रेणी लागू होणार आहे.
माता-भगिनींवर अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही. अशा नराधमांचा चौरंग्या केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
पिंपरी - चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रमुख अधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
श्रीक्षेत्र देहू - आळंदी पालखी मार्गावरील चऱ्होली येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित संत समुह शिल्पाचे बहुप्रतिक्षीत लोकार्पण मुख्यमंत्री फडवीस यांच्याहस्ते होत आहे.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा 'जैसे थे' ठेवून येत्या चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जाहीर करा, असेदेखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुदळवाडीमध्ये महानगरपालिका प्रशासनाने सरसटक अतिक्रमण कारवाई केली. यामध्ये अनेक लघुउद्योजकांचे मोठे नुकसान झाले. त्या सर्वांचे पुनर्वसन करावे अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर होते. यावेळी महेश लांडगे यांनी फक्त फडणवीसांचे कौतुक केल्यामुळे अजित पवारांनी फटकारले आहे.
महाराष्ट्रात महादेवाच्या नंदींचे व गोमातेच्या रक्ताचे वाहणारे पाट थांबवून शेतकरी समृद्ध व्हावेत. यासाठी पुण्याचे आराध्य दैवत भगवान श्री. ओंकारेश्वराच्या प्राचीन मंदिरात महाआरती करण्यात आली.