घर बसल्या करा मतदान, 'या' नागरिकांसाठी निवडणूक आयोगाची सुविधा (फोटो सौजन्य-X)
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आल्या असून महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २८८ जागांसाठी राज्यात मतदान होणार आहे. तर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. याचदरम्यान जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगा मार्फत काही नागरिकांना घर बसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. याचपार्श्वभूमीवर 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे वयोवृद्ध आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असणाऱ्या नागरिकांना घर बसल्या मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगा मार्फत देण्यात येणार आहे.
देशभरात 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची संख्या 82 लाख आहे तर 100 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे 2.18 लाख मतदार आहेत. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या 88.4 लाखांच्या घरात आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया रेकॉर्ड होणार आहे.