Haryana Election Results 2024 : हरयाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले असून आज (8 ऑक्टोबर) निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. हरियाणातील 90 जागांसाठी 464 अपक्ष आणि 101 महिलांसह एकूण 1,031 उमेदवार रिंगणात आहेत. या जागांसाठी 5 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान झाले होते. राज्यात 67.90 टक्के मतदान झाले. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांशी संबंधित सर्व ताज्या अपडेट्स येथे वाचा…
08 Oct 2024 03:33 PM (IST)
हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. राज्यातील निकालाचे जवळपास चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. हरियाणा निवडणुकीच्या आत्तापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजपला सतत आघाडी मिळताना दिसत आहे. भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय INLD दोन आणि इतर पाच जागांवर पुढे आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार, भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे आणि जर या ट्रेंडचे परिणामांमध्ये रूपांतर झाले, तर राज्याच्या निवडणूक इतिहासातील ही पक्षाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे, त्यामुळे भाजप हरयाणात गुलाल उधळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
08 Oct 2024 02:01 PM (IST)
हरयाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विनेश फोगट विजयी झाल्या आहेत. त्यांना भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांच्याशी कडवी टक्कर होती.फोगट सुरुवातीला कॅप्टन बैरागी यांच्यापेक्षा मागे होते, पण शेवटी 6,015 मतांनी विजयी झाले.
08 Oct 2024 01:34 PM (IST)
हरयाणा निवडणुकीतील ट्रेंडमध्ये हॅटट्रिक पाहता भाजपने 100 किलो जिलेबीची ऑर्डर दिली आहे. सोबतच हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा करत त्यांना हरियाणाच्या निकालाची माहिती दिली.
08 Oct 2024 12:55 PM (IST)
लोकसभा निवडणुकीप्रमाणे हरियाणातही निवडणूक आयोग संथ गतीने डेटा अपडेट करत आहे. जुनी आकडेवारी आणि दिशाभूल करणाऱ्या ट्रेंडच्या माध्यमातून भाजपला प्रशासनावर दबाव आणायचा आहे का? असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे.
08 Oct 2024 12:43 PM (IST)
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान भाजपचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी मनोहर लाल खट्टर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची बातमी समोर आली आहे.
08 Oct 2024 11:13 AM (IST)
हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल 2024: सकाळपासून जुलाना मतदारसंघातून आघाडीवर असलेल्या विनेश फोगट आता मागे पडल्या आहेत. हरियाणातील अनिल विजही मागे आहेत. लाडवा मतदारसंघातून नायब सिंह आघाडीवर आहेत. हिसारमधून सावित्री जिंदाल आघाडीवर आहेत. तोशाम मतदारसंघातून भाजपच्या श्रुती चौधरी आघाडीवर आहेत.
08 Oct 2024 10:05 AM (IST)
हरियाणातील ट्रेंडमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात निकराची स्पर्धा दिसून येत आहे. भाजप 42 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेसची आघाडी 40 जागांवर घसरली आहे. हरियाणातील ट्रेंडमध्ये मोठा उलथापालथ होताना दिसत आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. एकेकाळी ट्रेंडमध्ये काँग्रेस 65 जागांवर पुढे होती. आता भाजप 40 तर काँग्रेस 42 जागांवर आघाडीवर आहे. इतर 8 जागांवर आघाडीवर.
08 Oct 2024 09:30 AM (IST)
Haryana Assembly Election Results 2024 : हरयाणात सत्तांतर होणार
हरयाणातून आतापर्यंत आलेले कल पाहता काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे राज्याती सत्तांतर होणार असल्याच्या चर्चा हरयाणात होऊ लागल्या आहेत. जेजेपी नेते दुष्यंत चौटाला उचाना कलानमध्ये मागे आहेत. हिसारमधून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल पुढे आहेत. नरगौंडमध्ये भाजप नेते कॅप्टन अभिमन्यू मागे पडले आहेत. तोशाममधून भाजप नेत्या श्रुती चौधरी आघाडीवर आहेत. अटलीमधून भाजप नेत्या आरती सिंह राव आघाडीवर आहेत.
08 Oct 2024 09:10 AM (IST)
जुलाना मतदारसंघात विनेश फोगाट यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. कारण इथून सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये विनेश आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये विनेश फोगाट आघाडीवर आहे.
08 Oct 2024 08:58 AM (IST)
हरियाणा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं आहे. काँग्रेस नेते आलोक शर्मा म्हणाले की, हे सुरुवातीचे ट्रेंड आहेत, त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. पण पुढील १-१.५ तासांत ट्रेंड स्पष्ट होतील. हरियाणामध्ये काँग्रेसला 2/3 बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केेला.
08 Oct 2024 08:12 AM (IST)
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या मतमोजणीला आज काही मिनिटांपूर्वीच सुरूवात झाली आहे. सर्वप्रथम मतपत्रिकांची (बॅलेट पेपर) मोजणी सुरू आहे. हरियाणात सुरुवातीचे ट्रेंड दिसू लागले आहेत. हरियाणातील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस दोन जागांनी पुढे आहे.
08 Oct 2024 07:10 AM (IST)
हरियाणात 5 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान झाले होते. राज्यात 67.90 टक्के मतदान झाले. त्यानुसार, या निवडणुकीचे निकाल आज जाहीर केले जाणार आहेत. त्यापूर्वीच भाजपकडून विजयाचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री सैनी यांनी सांगितले की, ‘हरियाणामध्ये भाजपचे सरकार येणार आहे, ते 8 ऑक्टोबरला येईल आणि पूर्ण बहुमताने येईल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही हरियाणाला गती देण्याचे काम केले आहे’.
08 Oct 2024 06:33 AM (IST)
मतदान केल्यानंतर लोकांनी एक्झिट पोलचे निकाल पाहिले आहेत. अशा स्थितीत आता मतमोजणीच्या दिवशी हरियाणात भाजप आणि काँग्रेस यांच्यात खरा विजय कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलच्या निकालानुसार काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार हेही ठरवले जाईल. काँग्रेसचे नवे राजकारण कुठे चालले आहे, याचीही स्थिती स्पष्ट होणार आहे.
08 Oct 2024 06:32 AM (IST)
हरियाणामध्ये ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा रविवारी दिल्लीत पोहोचले. पक्षाच्या हायकमांडसोबत बैठक झाल्याची बातमी आली. हुड्डा हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.
08 Oct 2024 06:32 AM (IST)
मतदान संपल्यानंतर मुख्यमंत्री नायब सैनी यांनी राज्यात भाजप सरकार स्थापन करत असल्याचा दावा केला. सैनी म्हणाले की, त्यांच्याकडे सर्व अहवाल आहेत, ज्याच्या आधारे ते हे बोलत आहेत. नायब सैनी म्हणाले की, जनता मतांनी उत्तर देईल आणि काँग्रेस ईव्हीएमबद्दल रडायला लागेल. काँग्रेसवाले म्हणतील ईव्हीएम खराब आहे.
08 Oct 2024 06:32 AM (IST)
मतदानानंतर काँग्रेस नेते अशोक तंवर यांनी दावा केला की, काँग्रेस हरियाणात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करत आहे. या वेळी राज्यात परिस्थिती हात बदलेल. राज्यात बदलाचे वातावरण दिसत आहे. काँग्रेस 75 जागा जिंकत असून हा आकडा वाढू शकतो.