Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी निष्ठा विकली…’; समरजीतसिंह घाटगे यांचा कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. घाटगे यांनी महायुतीचे नेते व उमेदवार हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 14, 2024 | 03:42 PM
Samarjit Ghatge Kolhapur Assembly Election 2024

Samarjit Ghatge Kolhapur Assembly Election 2024

Follow Us
Close
Follow Us:

सेनापती कापशी : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून कोल्हापूरमध्ये राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. सेनापती कापशी (ता.कागल) येथे समरजीतसिंह घाटगे यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी ‘विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला धमक्या देत आहेत. त्यांच्या या असल्या धमक्यांना भीक घालू नका. हे मी नम्रतेने सांगत आहे माझी नम्रता म्हणजे माझी कमजोरी समजू नका,’ असे मत समरजीतसिंह घाटगे यांनी व्यक्त केले आहे.

प्रचारसभेमध्ये समरजीतसिंह घाटगे‌ म्हणाले,”सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला 40 हजार स्वाभिमानी जनतेने शेअर्सपोटी प्रत्येकी दहा हजार रुपये दिले. पण ते कारखान्याच्या रेकॉर्डवर कुठेच सभासद म्हणून नोंद नाहीत. हे सभासद रेकॉर्डवर नसताना त्यांना दिलेल्या साखरेची नोंद कारखान्यात होवू शकते का ? नाही. मग ही रेकॉर्डवर नसलेली साखर कोठून आली? या प्रश्नावर सभेतूनच उत्तर आले काटामारीतून मुश्रीफांनी विकासकामात मलिदा मारला. तोच मलिदा त्यांनी कारखान्यातही मारला आहे,” असा गंभीर आरोप समरजीतसिंह घाटगे यांनी केला.

पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी निष्ठा विकली

पुढे ते म्हणाले की, “पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली. त्यावेळी त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पोलिसांना घेराव घातला. पोलिसांना पालकमंत्र्यांच्या घरात पोहोचवू दिले नाही. पोट तिडकीने कार्यकर्त्यांनी साहेब आमचा वाघ आहे. अशा घोषणा दिल्या. पण पालकमंत्री साहेबांनी काय केलं तर मागच्या दाराने पळून गेले. आज काय वाटत असेल त्यांच्या त्या कार्यकर्त्यांना? पालकमंत्री मुश्रीफांनी लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे नाव बदलून हसन मियाॅलाल मुश्रीफ ठेवण्याचे स्वप्न पाहिले. मात्र कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानी बहाद्दर सभासदांनी त्यांच्या पॅनलला चिटपट करून त्यांचे स्वप्न धुळीस मिळविले. पालकमंत्र्यांनी नेहमीच पुरोगामी विचारांना तिलांजली दिली. शरद पवार साहेबांसोबतची निष्ठा विकली. कशासाठी तर ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी. त्यामुळे या निवडणुकीत या प्रवृत्तीला गाडूया,” असा निर्धार समरजीतसिंह घाटगे यांनी केला.

हे देखील वाचा : देवाभाऊ तुमसे ये उम्मीद नहीं थी…! नाशिकच्या सभेमध्ये नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

यावेळी स्वाती कोरी म्हणाल्या ,”गडहिंग्लज उपविभागाची अस्मिता असलेला गडहिंग्लज साखर कारखाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बंद पाडण्याचे पाप केले. गडहिंग्लज शहराला खाजगी मालमत्ता समजून त्यांनी विकायला काढले आहे.मी म्हणेल ती पूर्व दिशा,त्यांची हुकूमशाही व दडपशाही सुरु आहे.स्वर्गीय श्रीपतराव शिंदे, विक्रमसिंहराजे घाटगे,बाबासाहेब कुपेकर व सदाशिवराव मंडलिक यांच्या विचाराची स्वाभिमानी जनता हे चालू देणार नाही” असे मत स्वाती कोरी यांनी व्यक्त केले.

दत्तोपंत वालावलकर म्हणाले,” गेली पंचवीस वर्षे आम्ही मुश्रीफांच्या विचारधारेला विरोध करत आलो आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या त्यांच्या धोरणाविरोधात आम्ही काम केले आहे.‌ या निवडणुकीत संजयबाबा घाटगे यांनी विचार बदलला, मुश्रीफांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. म्हणून आम्ही त्यांना नमस्कार केला. मुश्रीफांनी आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व संजयबाबा तुम्हाला दिलेला त्रास, तुम्ही विसरला असाल. पण आम्ही तीळभरही विसरलेलो नाही.” असे ते म्हणाले.

हे देखील वाचा : पोलिसांची नजर चुकवली अन् गोत्यात आला; नागपूरात कोट्यवधींची रोकड नेणाऱ्या तरुणाला अटक

उमेश देसाई म्हणाले,” पाण्याच्या रूपाने स्वर्गीय सदाशिव मंडलिक यांनी शाश्वत विकासाचे काम केले आहे. चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरत नव्हते त्यावेळी धरणच चुकीच्या जागी बांधले गेलेचा डांगोरा पेटवला. मात्र राजे समरजितसिंह घाटगे यांनी यावर उपाय शोधून कार्य केले आणि गेल्या तीन चार वर्षापासून धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. याला शाश्वत विकास म्हणावे लागेल.” यावेळी बोलताना ॲड .सुरेश कुराडे म्हणाले, कापशी खोऱ्याची माती ही क्रांतिकारकांची आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांची या मातीशी नाळ खूप घट्ट जुळलेली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना गाढण्याचं स्व.मंडलिकांचे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा निरोप घेऊनच मी आपल्याकडे आलो आहे”

मित्रा तुला झोप लागावी याच माझ्या शुभेच्छा

“विशेष म्हणजे पालकमंत्र्यांची “ईडी”च्या ऑफिसमध्ये असलेली त्यांची फाईल अद्यापही बंद झालेली नाही. ती फक्त वरच्या खिडकीत जपून ठेवलेली आहे. कारण या फाईलमध्ये अन्य कोणा कोणाची नावे आहेत ते लवकरच कळेल. त्यामुळे शशिकांत मित्रा तु ही जरा जपून राहा. तेवीस तारखेनंतर मित्रा तुला झोप लागावी याच माझ्या शुभेच्छा. कापशी खोऱ्यातील स्वाभिमानी जनतेने राजे समरजितसिंह घाटगे यांच्यासारख्या निष्कलंक, चारित्र्यवान नेतृत्वाला येत्या २० तारखेला मतदान करून इतिहास घडवावा.” असे आवाहन ॲड सुरेश कुराडे यांनी केले.

Web Title: Kolhapur assembly election 2024 samarjit ghatges serious allegation against hasan mushrif

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 03:42 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.