आचारसंहितेदरम्यान मोठा ऐवज पोलिसांकडून जप्त
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत निवडणुकांच्या घोषणेबरोबरच राज्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यानंतर सर्व तपास यंत्रणा आणि पोलीस राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. प्रत्येक ठिकाणी पोलिस गाड्यांचीही तपासणी करताना दिसत आहे. अशाच तपासादरम्यान पोलिसांनी पालघरमधील एका वाहनातून तीन कोटींहून अधिक रोकड जप्त करून आरोपीला अटक केली असल्याचे आता समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघरच्या वाडा पाली मार्गावरून विक्रमगडच्या दिशेने जाताना हा प्रकार पाहून पोलिसांना संशय आला. यानंतर कार थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान संशय वाढल्याने कार वाडा पोलिस ठाण्यात आणून तपास करण्यात आला. तपासादरम्यान कारमधून सुमारे 3 कोटी 70 लाख रुपये जप्त करण्यात आले. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे PTI च्या वृत्तानुसार सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – iStock)
मुंबईत 2 कोटी 30 लाख रुपये सापडले
मुंबईतही 2 कोटींहून अधिक रोख रकमेसह 12 जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जात असल्याची गुप्त माहिती LT मार्ग पोलिस स्टेशनला मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शहरातील भुलेश्वर मार्केट, काळबादेवी येथून 12 जणांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.
यानंतर संशयितांना प्रथम मुंबादेवी पोलिस चौकीत चौकशीसाठी नेण्यात आले, त्यानंतर नोडल ऑफिसर सुरेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 186-मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील फ्लाइंग स्क्वॉड टीम (एफएसटी) यांना तातडीने माहिती देण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पथकाने तत्काळ छायाचित्रकारांसह कारवाईचे रेकॉर्डिंग करण्यासाठी घटनास्थळ गाठले.
यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आणि ताब्यात घेतलेल्यांचा शोध सुरू केला. या काळात पोलिसांना त्याच्या बॅगेतून 2 कोटी 30 लाखांहून अधिक रुपये सापडले असल्याचे आता समोर आले आहे.
हेदेखील वाचा – पुणे पोलिसांची मोठी कारवाई; FC कॉलेजमधून बॅटऱ्या चोरणाऱ्यांना केली अटक
तपासणी
आचारसंहिता लागू झाल्यापासून ठिकठिकाणी पोलिस कार्सची तपासणी करत आहेत. मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन जाणे आचारसंहितेदरम्यान निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाने केलेल्या् विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे सध्या बेकायदा पैशांची ने आण अथवा बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू या वस्तू कोणाहीजवळ सापल्यास सदर व्यक्तीवर संबंधित कारवाई केली जात आहे. सध्या नाक्यानाक्यावर पोलिसांची फौज यासाठी तैनात असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात महाराष्ट्रात निवडणूक पार पडणार आहे आणि मतदारांना यादिवशी मतदान करता येईल. तर 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या राजकारणाचा निकाल समोर येणार आहे.
हेदेखील वाचा – भूखंड विक्रीच्या नावावर 3 कोटींचा घातला गंडा; ना रजिस्ट्रेशन केले ना पावती दिली