ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात भारतीय जनता पक्षाने मुख्य आरोपी म्हणून ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर तीव्र आरोपांची सरबत्ती केली होती.
नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल आता फुंकले गेले आहे आणि आता खऱ्या आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. पालघर मतदार यादीमधील गोंधळावरून आता राजकारण तापत चालल्याचे दिसून येत आहे
विक्रमगडमध्ये आता केंद्र सरकारने केंद्रीय मोटर वाहन कायद्यात मोठे बदल केले असून नागरिकांना आता नियमांचे उल्लंघन केल्यास भरपूर पटीने पैसे मोजावे लागणार आहेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या
पालघर आणि डहाणू तालुक्यात असणाऱ्या अनेक प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. लवकरच बीएमसी निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात येतील
चंदेरी पापलेटच्या संवर्धनासाठी आता जनजागृती आवश्यक असल्याचे समोर येत आहे. या माशाला राज्य माशाचा दर्जा प्राप्त आहे. असे असूनही प्रजाती धोक्यात येत असल्याने दंडात्मक कारवाई करावी लागणार आहे
पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर- २ सरकारला तीन वर्षे का लागली? आता पालघर साधु हत्येच्या विषयाचा राजकीय उपयोग महायुतीसाठी संपला का? असे सवाल सचिन सावंत यांनी विचारले आहेत.
मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील बोगस कारभार नागरिकांसमोर उघडकीस झाला आहे. या रुग्णालयात चक्क डॉक्टर नसल्याने प्रसूतीत बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पालघरमधील मोखाडा तालुक्यात शिवसेनाचा (शिंदे गट) कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. निवडणूकीसाठी सज्ज राहा असे आवाहन आमदार रविंद्र फाटक यांनी या मेळाव्यात केले.
मागील तीन वर्षांपासून नागरिक या रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. अनेक वेळा तक्रारी, अर्ज आणि विनंत्या करूनही अद्याप कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ग्रुप ग्रामपंचायत वावर वांगणी येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष दिनी वावर वांगणी ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांनी श्रमदानातून मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी मंगळवारीमनोर शहरातील विविध गणेश मंडळांचे मंडप तसेच विसर्जन स्थळांची धावती पाहणी दौरा केली आहे.
गुरुवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक १३ येथील मेडले फार्मा कंपनीत नायट्रोजन रिॲक्शन टँकमधून गॅसची गळती झाली.