महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडणार? 'या' मुद्यावरून शिंदे-पवार गटात अस्वस्थता
नागपूर : राज्यामध्ये लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा होणार आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून दहा दिवस होऊन गेल्यानंतर देखील महायुतीमधील नाराजीनाट्यमुळे सरकार स्थापनेला विलंब झाला आहे. यामध्ये आता शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरु असून नागपूरमधील एका खास चहावाल्याला मुंबईतील या शपथविधी सोहळ्याचे देवेंद्र फडणवीस यांची आमंत्रण दिले आहे.
महायुतीचा शपथविधी सोहळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पार पडणार आहे. याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार दिवसांपूर्वीच केली आहे. मात्र महायुतीचे मुख्यमंत्री कोण हे नाव मात्र गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आले आहे. यानंतर आता शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांना व व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र सध्या नागपूरच्या एका चहावाल्याला देण्यात आलेल्या आमंत्रणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नागपूरमधील गोपाल बावनकुळे यांना मुंबईतील महाराष्ट्रातील महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. गोपाल बावनकुळे हे नागपूरमधील चहाविक्रेते आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे चाहते आहेत. नागपूरमधील रामनगरमध्ये ते चहाचा व्यवसाय करतात. त्यांनी दुकानामध्ये कोणत्याही देवाचा नाही तर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गोपाल बावनकुळे यांच्या चहाच्या स्टॉलला भेट देखील दिली आहे. यावेळी पुन्हा प्यायला नक्की या मुख्यमंत्री असे गोपाळ बावनकुळे म्हणाले होते. आता नागपूरचे फडणवीसांचे चाहते असलेले चहाविक्रेते गोपाल बावनकुळे यांना मुंबईतील शपथविधीचे आमंत्रण मिळाले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
शपथविधी सोहळ्याला आमंत्रण मिळाल्यामुळे गोपाल बावनकुळे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, “५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीसाठी मला पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी पास पाठवला आहे. मी आवर्जुन उपस्थित राहणार आहे. चहावाला म्हणून मला आमंत्रण दिलंय. आम्ही त्यांना मेसेज करतो किंवा कोणत्याही माध्यमातून त्यांची भेट घेतो तेव्हा ते आम्हाला मदत करतात. या दिवशी मी जाणार असलो तरी चहाचा स्टॉल चालू राहिल. आणि मोफत चहा वाटप केले जाईल, अशा भावना नागपूरचे चहा विक्रेते गोपाल बावनकुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी
महायुतीचा शपथविधी सोहळा 6 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार आहे. यासाठी भाजपची जोरदार तयारी देखील सुरु आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल (दि.02) आझाद मैदानाची पाहणी केली. त्याचबरोबर भाजप नेते प्रवीण दरेकर व आशिष शेलार यांनी देखील पाहणी केली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह देशभरातील महत्त्वाचे नेते, संत, महंत उपस्थित राहणार आहेत.