विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले...
विरार: महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा (Cash for Vote)गंभीर आरोप करण्यात आला आहे. दरम्यान बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर हे दाखल त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान या सगळ्या घटनेवर राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “बाहेरची लोक मतदारसंघात कशासाठी येतात? त्यांना मतदारसंघाची काय माहिती आहे?माझ्या इथे अंधाऱ्या गल्ल्या आहेत. उद्या कोणी अनोळखी माणूस घुसला तर काय करायच?”‘
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, “कोणीही येते, कुठेही घुसते, नाकेबंदी नाही, तपासणी नाही. आम्ही व्हिडिओ दाखवला तर पोलीस त्या पाण्याच्या बाटल्या असू शकतात असे म्हणतात. खाकी बॉक्समधून कधीही पाण्याच्या बाटल्या जात नाहीत हे बहुतेक पोलिसांना माहिती नाही. खाकी बॉक्समधून दारूच्या बाटल्याच नेल्या जातात. सत्ताधारीच पोलीस प्रशासन चालवतात. पोलिसांनी पोलिसांचा गणवेश सोडून पक्षाचा गणवेश घालावा’, असे आव्हाड म्हणाले.
विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. आमदार क्षितीज ठाकूर हे घटनास्थळी असून तणाव वाढला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावरच पैशांची पाकिटे रिकामी केली. दरम्यान, अनेक पोलीस अधिकारीही हॉटेलमध्ये पोहोचले असून विवांता हॉटेलमध्ये बीव्हीएचे कार्यकर्ते जमत आहेत.
हेही वाचा: Vinod Tawde: भाजपा आणि बविआचा मोठा राडा; निवडणूक आयोगाकडून विनोद तावडेंची गाडी तपासली
या गोंधळात बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर हॉटेलवर पोहोचले आहेत. त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूरही त्यांच्यासोबत आहे. विनोद तावडे येथे पाच कोटी घेऊन आल्याचा आरोप हितेंद्र यांनी केला. त्यांच्याकडून दोन डायरी जप्त करण्यात आल्या आहेत. हितेंद्र आणि त्यांचा मुलगा दोघेही वसई आणि नालासोपारा येथून आमदार आहेत. यावेळी क्षितिज पुन्हा नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा: विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांना गेल्या २४ तासांपासून बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी घेरले आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते आणि विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांनी तावडे यांनी पाच कोटी रुपये आणल्याचा आरोप केला आहे. याबाबत वसई-विराचे आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले, ‘केवळ 5 कोटी रुपयांचे वाटप केले जात आहे. मला डायरी सापडल्या आहेत. लॅपटॉप आहे. हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंनी कुठे आणि कशाचे वितरण केले याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला.