Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुख्यमंत्रिपदासाठी अचानक नवीन नावं येऊ शकतात समोर’; विनोद तावडेंचं सूचक विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात विनोद तावडे यांचे नाव आहेच. शिवाय, भाजपच्या राष्ट्रीय राजकारणातही विनोद तावडे यांचं नाव आहे. अमित शहा यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 14, 2024 | 11:33 AM
'मुख्यमंत्रिपदासाठी अचानक नवीन नावं येऊ शकतात समोर'; विनोद तावडेंचं सूचक विधान

'मुख्यमंत्रिपदासाठी अचानक नवीन नावं येऊ शकतात समोर'; विनोद तावडेंचं सूचक विधान

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. महायुतीतील भाजप असो किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी काही विधानंही समोर आली आहेत. असे असताना आता ‘मुख्यमंत्रिपदासाठी अचानक नवीन नावं समोर येऊ शकतात’, असं सूचक वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे.

हेदेखील वाचा : ‘हर हर महादेव…’चा गजर अन् उघड्या अंगाने काट्यांच्या ढिगाऱ्यात उडी; गुळूंचे येथील काटेबारस यात्रा उत्साहात

एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, ‘राज्यातील निवडणुकांनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून त्यावेळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल, हे ठरवतील. मुख्यमंत्रिपदासाठी अचानकपणे इतरही काही नावे येऊ शकतात. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जो प्रयोग केला, तसा राज्यातही होऊ शकतो’, असेही त्यांनी सांगितले.

तसेच मनसेने आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यांनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मनसेबाबत आता परप्रातीयांचा मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे भाजपच्या मतांवर परिणाम होणार नाही. माहीमबाबत बोलायचे झाले तर लोकसभा निवडणुकीनंतर मनसेला काही जागांवर पाठिंबा दर्शविण्याचा विचार होता. जर सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत तर शिवसेना (उबाठा)चा उमेदवार निवडून येण्याची शक्यता होती. त्यानंतर आता आपल्या सर्वांसमोर जे चित्र आहे, ते स्पष्ट आहे.

राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडेंचं नाव

महाराष्ट्राच्या राजकारणात विनोद तावडे यांचे नाव आहेच. शिवाय, भाजपच्या राष्ट्रीय राजकारणातही विनोद तावडे यांचं नाव आहे. अमित शहा यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे. तावडे हे सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारीही आहेत. सध्या तावडे आपल्या गृहराज्यातील निवडणुकीचा प्रचार करत आहेत. या सरकारवर जनतेचा विश्वास असल्याने राज्यात पुन्हा भाजपचे महायुतीचे सरकार येणार असल्याचे बोलले जात आहे.

एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाचा घेतला जाणार निर्णय

महायुती यंदाची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून त्यावेळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल, हे ठरवतील. मुख्यमंत्रिपदासाठी अचानकपणे इतरही काही नावे येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नरिमन पॉइंटवरून अवघ्या 35-40 मिनिटांत पोहोचणार विरार,काय आहे प्रकल्प?

Web Title: Suddenly new names may emerge for chief ministers post says vinod tawde nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 11:33 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Vinod Tawde

संबंधित बातम्या

BJP President: राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर, RSS ची भूमिका काय?
1

BJP President: राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर, RSS ची भूमिका काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.