File Photo : Yatra
नीरा : पुणे जिल्ह्यातील नीरा नाजिक गुळुंचे (ता.पुरंदर) येथील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारास यात्रा बुधवारी (दि.१३) मोठ्या उत्साहात पार पडली. ‘हर हर भोले, हर हर महादेव’चा गजर करत अडीचशे होऊन जास्त भक्तगणांनी काट्यांच्या ढिगार्यामध्ये उड्या घेत ही काटेबारस यात्रा पार पडली. ही यात्रा आणि या यात्रेतील हे रोमांचकारी दृश्य याची ‘देही याची डोळे’ पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक मोठ्या संख्येने गुळूंचे येथे दाखल झाले होते.
हेदेखील वाचा :मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नरिमन पॉइंटवरून अवघ्या 35-40 मिनिटांत पोहोचणार विरार,काय आहे प्रकल्प?
कार्तिक शुद्ध प्रथमा या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पाडव्या दिवशी येथील ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. या काटेबरस यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. आज पहाटे देवाला अभिषेक करण्यात आला. यानंतर बुधवारी अकरा वाजता देवाची पालखी आपल्या बहिणीला आणण्यासाठी गेली. तर दुपारी एक वाजता ही पालखी पुन्हा मंदिरामध्ये आली. यानंतर काटे मोडवन यात्रेच्या मुख्य उत्सवाला सुरुवात झाली.
250 हून अधिक भक्तगणांनी या काटेबारस यात्रेमध्ये काट्यांच्या ढिगामध्ये उड्या घेतल्या. अगदी पाण्यात सूर मारावा, अशा पद्धतीने काट्यांच्या ढिगार्यात उड्या मारणारे भक्तगण पाहून पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आला नाही तर नवलच !, हे रोमांचकारी दृश्य पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी आले होते.
आपल्या रुसलेला बहिणीला मनवण्यासाठी देवाने काट्याच्या ढिगामध्ये उड्या घेतल्या होत्या. अशी अख्यायिका याबाबत सांगितली जाते. तर ४०० वर्षापेक्षा जास्त मोठी परंपरा या यात्रेला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. आज पार पडलेल्या या यात्रेतील कटेमोडवण पाहण्यासाठी सुमारे पाच हजार भाविकांनी उपस्थिती दर्शविली.
भगवान शिवाप्रति असलेली भक्तांची असीम श्रद्धा आली दिसून
भगवान शिवाप्रति असलेली भक्तांची असीम श्रद्धा यावेळी दिसून आली. काट्यांवर मुक्तपणे लोळल्यानंतर भक्तांना मंदिरात घेऊन जात होते. यात्रेत युवकांनी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात होती. मानाची शेवटच्या भक्ताने उडी मारल्यानंतर काटेरी फास जाळून टाकण्यात आले. यात्रेची सांगता नंतर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.
हेदेखील वाचा : ‘मुहम्मद विमानात बॉम्ब घेऊन बसला…’, मुंबई विमानतळावर पुन्हा बॅाम्बने उडवण्याची धमकी