Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण

Entertainment News: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री इवा ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या नव्या प्रोजेक्टमुळे नव्हे, तर वैयक्तिक आयुष्याबाबत केलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे ती चर्चेत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 25, 2026 | 01:02 PM
Actress Eva Grover (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Actress Eva Grover (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्री इवा ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत
  • वैयक्तिक आयुष्याबाबत केलेला धक्कादायक खुलासा
  • शरीरावर झालेल्या जखमा पाहून कुटुंबीय चिंतेत
Actress Eva Grover: छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री इवा ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण तिचा नवा प्रोजेक्ट नसून, तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेला धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना इवाने तिच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक कटू अनुभव पहिल्यांदाच उघडपणे माध्यमांना सांगितले. तिच्या या वक्तव्यामुळे मनोरंजन विश्वात मोठी चर्चा रंगली आहे. (Entertainment News:)

संसार टिकवण्यासाठी तडजोड

इवाचा विवाह हैदर अली खान याच्यासोबत झाला. हैदर हा अभिनेता आमिर खानचा सावत्र भाऊ आहे. लग्नानंतरचे आयुष्य अपेक्षेप्रमाणे सुखाचे नव्हते, असे सांगताना इवा भावूक झाली. तिने सांगितले की, संसार टिकवण्यासाठी तिने अनेक तडजोडी केल्या, पण परिस्थिती दिवसेंदिवस अधिक कठीण होत गेली.

चुकीच्या गोष्टी करण्यासाठी दबाव

मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की, करिअरच्या बदल्यात काही चुकीच्या गोष्टी करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला गेला होता का? यावर उत्तर देताना इवाने सांगितले की, तिच्या एक्स पतीने तिला काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी जवळीक वाढवण्याचा सल्ला दिला होता. हा विषय तिच्यासाठी अत्यंत वेदनादायक असल्याचे तिने स्पष्ट केले.

FD, प्रॉपर्टी अशी मालमत्ता विकली

इवाच्या म्हणण्यानुसार, तिच्याकडे कामाची कमतरता नव्हती. अनेक मालिकांमध्ये आणि प्रोजेक्टमध्ये ती सातत्याने काम करत होती. मात्र एका टप्प्यावर तिने कुटुंबासाठी स्वतःच्या बचतीचा वापर केला. एफडी, प्रॉपर्टी अशी मालमत्ता विकली. घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तिने शक्य ते सर्व प्रयत्न केले.

मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचीकरण

याच काळात तिला असे काही प्रस्ताव स्वीकारण्याचा सल्ला देण्यात आला, ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली. घरातील वाढते खर्च, लाईटबील, मुलाच्या वाढता खर्च अनेक गोष्टीचे प्रेशर तिच्यावर आले. त्या क्षणी तिला स्वतःचा सन्मान आणि स्वाभिमान अधिक महत्त्वाचा वाटला. त्यामुळे तिने तो संबंध कायमचा संपवण्याचा निर्णय घेतला.

Pach Futacha Bachchan Movie: ‘पाच फुटाचा बच्चन’मध्ये दडलेलं रहस्य काय? ‘राम कृष्ण हरी’च्या गजरात उलगडणार अनोखी कथा

पतीच्या मानसिक आजाराबद्दल कल्पना नव्हती…

इवाने आणखी एक महत्त्वाचा खुलासा करत सांगितले की, लग्नाच्या वेळी तिला तिच्या पतीच्या मानसिक आजाराबद्दल फारशी माहिती नव्हती. कालांतराने त्याच्या वागण्यात मोठे बदल दिसू लागले. त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला आणि घरातील वातावरणही बिघडत गेले.

शरीरावर जखमा

तिने सांगितले की, अनेकदा परिस्थिती इतकी गंभीर व्हायची की, तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहून कुटुंबीय चिंतेत पडायचे. सतत भीतीच्या वातावरणात राहणे तिच्यासाठी अशक्य झाले होते. अखेर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तिने वेगळा मार्ग स्वीकारला.

एक्स पतीबद्दल द्वेष

विशेष म्हणजे, इतके सर्व घडूनही इवाच्या मनात एक्स पतीबद्दल द्वेष नाही. आज त्याची अवस्था चांगली नसल्याचे सांगताना तिने खंत व्यक्त केली. त्याच्याकडे स्थिर राहण्याची जागा नाही, आर्थिक अडचणी आहेत आणि त्याची योग्य काळजी घेणारेही फारसे कोणी नसल्याचे तिने सांगितले.

Akanksha Puri On CJP Protest: “आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे दिले जात आहेत,” अभिनेत्रीच्या धक्कादायक दाव्याने देशभरात खळबळ

इवा म्हणाली की, भूतकाळ विसरणे सोपे नसते. काही जखमा आयुष्यभर मनात राहतात. तरीही एक माणूस म्हणून दुसऱ्याबद्दल वाईट वाटणे स्वाभाविक आहे. एकेकाळी आम्ही एकत्र आयुष्य जगण्याची स्वप्ने पाहिली होती, त्यामुळे त्याची आजची परिस्थिती पाहून मनाला वेदना होतात, असेही तिने नमूद केले. इवाच्या या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी अशा गंभीर विषयांवर अधिक संवेदनशीलतेने चर्चा होण्याची गरज व्यक्त केली. अनेक चाहत्यांनी तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या असून, कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी तिने दाखवलेल्या धैर्याचेही कौतुक केले आहे.

Web Title: Aamir khan step brother hyder ali asked wife eva to sleep with director for money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • tv reality show

संबंधित बातम्या

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य
1

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?
2

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?

The India Story Review: दमदार विषय, पण कमकुवत स्क्रीनप्लेमुळे फिका पडला श्रेयस तळपदेचा चित्रपट
3

The India Story Review: दमदार विषय, पण कमकुवत स्क्रीनप्लेमुळे फिका पडला श्रेयस तळपदेचा चित्रपट

Kissing Controversy: किसिंग वादानंतर अभिजीत भट्टाचार्यांनी उदित नारायण यांना दिला होता खास सल्ला; वर्षभरानंतर केला मोठा खुलासा
4

Kissing Controversy: किसिंग वादानंतर अभिजीत भट्टाचार्यांनी उदित नारायण यांना दिला होता खास सल्ला; वर्षभरानंतर केला मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.