

अविनाश मिश्राने मागितली ईशा सिंगची माफी
क्लबमधील व्हिडिओमुळे वाढला वाद
'मी दोषी आहे', अभिनेत्याची कबुली
अभिनेता अविनाश मिश्रा त्याच्या वैयक्तिक वादामुळे गेले काही दिवस सातत्याने चर्चेत बघायला मिळतो. अभिनेता अविनाश मिश्रा आणि त्याची गर्लफ्रेंड इशा सिंग यांचं नातं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत बघायला मिळालं.
नुकत्याच झालेल्या 'खतरों के खिलाडी' या शोचा विजेता झाल्यानंतर अविनाश पुन्हा एकदा चर्चेत बघायला मिळाला. यावेळी इशा सिंग आणि अविनाश यांनी त्यांचं नातं अनेकदा उघडपणे सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वीच इशा सिंगने अविनाशला सोशल मीडियावर अनफॉलो केलं होतं आणि त्याच्या ब्रेकअपच्या बातम्या सुरू झाल्या. आता अविनाशने स्वतः सोशल मीडियावर माफी मागितली आहे.
काही दिवसांपूर्वी अविनाशचा एक व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये तो ब्रेकअप झाल्यानंतर एका क्लबमध्ये पार्टी करताना दिसल्याने हा वाद अजून वाढला. तो डीजे स्टेशनवर आला आणि त्याने 'बेवफा तू निकली' हे गाणं वाजवलं. त्याने असंही म्हटलं की, जेव्हा एखादी व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात बिझी असते, तेव्हा हे गाणं योग्य ठरतं.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली होती आणि तिने स्पष्टीकरण पण दिलं होतं, एवढंच नाही तर अभिनेत्याला इशारा पण दिला होता. ईशाचा सख्खा भाऊ आणि दत्तक भाऊ रजत दलालने या अभिनेत्याचा पर्दाफाश केला. लोकांनी अविनाशला ट्रोलही केलं, वाढता वाद बघून, अविनाशने आता त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक मोठा व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितली आहे.
अभिनेता अविनाशने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय आणि यामध्ये त्याने माफी मागितली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता म्हणतो की, "त्याला आता हा वाद संपवायचा आहे, त्याने ईशा सिंगसोबतच्या ब्रेकअपसाठी स्वतःलाही जबाबदार धरलं.
अभिनेता म्हणाला, "मी माझ्या डीजेवर एक गाणं वाजवलं. त्यातून अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यात अनेक फेरफार केले जात आहेत. मला माहित आहे की यामुळे ईशाला सगळ्यात जास्त त्रास होतोय, तिचं कुटुंब दुःखी आहे. माझा तसा कोणताही हेतू नव्हता. पण जे काही घडलं त्यासाठी मी माफी मागतो. मी ईशासाठी जबाबदार आहे आणि आम्ही वेगळे झालो आहोत. मी दोषी आहे. ही माझी चूक आहे. मी फक्त माफी मागायला आलोय."
"मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, या प्रकरणात कुटुंबियांना आणि मित्रांना गोवू नका. हे घडायला नको होतं. मी सगळ्यांना विनंती करतो की हे प्रकरण इथेच संपवा, ते वाढवू नका. हा दोन व्यक्तींमधला प्रश्न आहे, कुटुंबियांना आणि मित्रांना अशा धमक्या पाठवू नका.
मला स्वतःवर काम करण्याची गरज आहे. मला स्वतःमध्ये सुधारणा करून स्वतःला सावरायचं आहे. हे महत्त्वाचं आहे. मी बरा झाल्यावरच परत येईन. तोपर्यंत, सगळ्यांनी कृपया स्वतःची काळजी घ्या. चला, हे प्रकरण इथेच संपवूया." अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.