Vikrant Massey Shah Rukh Khan Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अभिनेता विक्रांत मेसीने मुंबईतल्या एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. शनिवारी (21 नोव्हेंबर) झालेल्या या इव्हेंटमध्ये अभिनेता बोमन इराणी पण हजर होता. या इव्हेंटमधला शाहरुख आणि विक्रांत मेसीचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ बघून चाहते विक्रांत मेसीचं कौतुक करतायत. Vikrant Massey Shah Rukh Khan Video:
व्हिडीओमध्ये दिसतंय की शाहरुख खान, बोमन इराणी आणि विक्रांत मेसी स्टेजवर उभे आहेत. तेव्हा विक्रांत मेसी शाहरुखच्या पायाला हात लावताना दिसतो. शाहरुखच्या पण लक्षात येताच तो पण मागे वळून बघत असल्याचं दिसतं.
त्यानंतर परत विक्रांत मेसी शाहरुखच्या पायाला हात लावतो. विक्रांत मेसीच्या या कृतीमुळे त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झालाय आणि नेटकरी पण त्याचं कौतुक करतायत.
या व्हायरल व्हिडीओत विक्रांत मेसी शाहरुखच्या पायाला हात लावताना दिसतोय. त्यामुळे पहिल्यांदा बघितल्यावर असंच वाटतं की तो शाहरुखच्या पाया पडला. पण, खरं तर विक्रांत मेसी शाहरुखच्या पाया पडण्यासाठी नाही तर त्याची ट्राऊजर नीट करण्यासाठी खाली वाकला होता. शाहरुखची पँट पाठीमागून दुमडली गेली होती. ती नीट करण्यासाठी विक्रांत मेसी खाली वाकला होता. शाहरुखच्या पण लक्षात येताच त्याने पण त्याचे आभार मानले.
खरं तर विक्रांतने जे केलं ते बघून सगळ्यांनाच त्याचा स्वभाव किती साधा आहे हे कळलं. एवढा मोठा स्टार असून पण त्याने कोणताही मोठेपणा न दाखवता शाहरुखची पँट नीट केली. स्टेजवर एवढे लोक असताना त्याने हे केलं, यामुळेच लोक त्याला आणखीन जास्त पसंत करतायत. शाहरुखने पण त्याला हसून धन्यवाद दिलं.
View this post on Instagram
लोक म्हणतायत, विक्रांत मेसी खरंच जमिनीवर पाय ठेवून राहणारा माणूस आहे. काही जण म्हणतायत, एवढ्या मोठ्या स्टारसमोर पण त्याने लाज न बाळगता मदत केली, हेच त्याचं मोठेपण आहे. या एका छोट्या व्हिडीओमुळे विक्रांत मेसी पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि त्याचे चाहते वाढलेत.
Ans: मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात विक्रांत मेसी आणि शाहरुख खान एकत्र आले होते.
Ans: नाही. विक्रांत मेसी शाहरुख खानच्या पाया पडला नव्हता, तर त्याची मागून दुमडलेली ट्राऊजर नीट करत होता.
Ans: शाहरुख खानची ट्राऊजर नीट करण्यासाठी विक्रांतने दाखवलेल्या साधेपणामुळे आणि मदतीच्या स्वभावामुळे त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.






