Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गश्मीर महाजनीचा दमदार ‘गोंधळ’! ‘सालबर्डी’ चित्रपटातील जागर लवकरच होणार प्रदर्शित

गोंधळी हा महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक असून त्याची भक्ती आणि ऊर्जा प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करते. येत्या १७ एप्रिल प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ चित्रपटात गश्मीर महाजनी दमदार गोंधळी साकारतोय.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 18, 2026 | 05:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

गांवोगावी फिरून आई जगदंबेचा जागर करणारा गोंधळी हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक आहे. त्याची भक्ती, त्याचा नाद आणि ऊर्जा आपल्यातही चैतन्य निर्माण करतो. येत्या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या आगामी मराठी चित्रपट ‘सालबर्डी’मध्ये अभिनेता गश्मीर महाजनी दमदार गोंधळी साकारताना पाहायला मिळणार आहे. ‘काळरातीचा जोर वाढला घोर, होई शिरजोर गं जगदंबे’ या गोंधळ गीतामध्ये गश्मीरने पारंपरिक वेशभूषा, प्रभावी देहबोली आणि कमालीचा नृत्याविष्कार सादर केला आहे. नुकतेच हा गीत प्रेक्षकांसमोर आले असून त्याला जोरदार प्रतिसाद मिळतोय. कथानकात जगदंबेचा हा गोंधळ थरार आणि उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे. संबळाच्या ठेक्यावर गोंधळीची एन्ट्री आणि रहस्यमय वातावरण चित्रपटाच्या रंगत वाढविते.

Rajpal Yadav यांना चेक बाऊन्स प्रकरणात दिलासा; Delhi High Court ने अंतरिम जामीनाची मुदत वाढवली

गीतकार मुकुंद भालेराव यांच्या लेखणीतून सजलेला हा गोंधळ, संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांच्या संगीतसाजाने आणखी आकर्षक झाला आहे. तसेच अजय गोगावले यांचा दमदार स्वर या गाण्याला जीवदान देतो. गोंधळाचे नृत्य आशिष पाटील यांच्या अदाकारीने आणि नृत्यदिग्दर्शनाने प्रेक्षकांसमोर रंगतदार सादरीकरण घडवते. गोंधळी येतो का गावातील गूढ रहस्य उलगडण्यासाठी? या प्रश्नामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत गश्मीर महाजनी म्हणतो, “गोंधळ ही केवळ परंपरा नाही, तर देवीभक्तीची ऊर्जा आहे. ‘सालबर्डी’मधील माझा गोंधळी कथानकाला वेगळी दिशा देणारा महत्त्वाचा दुवा आहे. गोंधळ गीतातील ऊर्जा, नाद आणि पारंपरिक वातावरण शूटिंग करताना अंगावर रोमांच उभे करत होते. प्रेक्षकांनाही हा अनुभव नक्कीच जाणवेल.”

‘सालबर्डी’ हा चित्रपट महाराष्ट्रातील दुर्गम भागातील रहस्यमय घटनांचा थरारक शोध घेतो. नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेला हा चित्रपट अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी निर्मित केला आहे, तर दिग्दर्शनाची जबाबदारी रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. त्यांच्या अभिनयाने कथानक अधिक समृद्ध झाले आहे.

शिव ठाकरेच्या “मी धुरंधर” गाण्यावर प्रेक्षक झाले फिदा, सोशल मीडियावर धुमाकूळ

गोंधळीच्या पारंपरिक नृत्याचा थरार, रहस्यमय वातावरण आणि कथानकाची उत्कंठा ‘सालबर्डी’ प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार आहे.

Web Title: Gashmeer mahajanis powerful gondhal the jagar from the film salbardi is set to be released soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 05:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.