
फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणते की, ती 15 वर्षांची असताना तिला या गोष्टींना सामोरे जावे लागले होते. तेव्हा ती शाळेत IT क्लासमध्ये गेली होती. तिच्या वर्गमित्रांपैकी काही मुलं लेक्चरदरम्यान PC वर अशा विकृती पाहायचे. अशामध्ये एकदा Adult Site वर जान्हवीचा Morphed फोटो झळकला होता, ज्यामुळे जान्हवी मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे गेली होती.
मुलाखतीत जान्हवीने संताप व्यक्त केला. ती म्हणाली की, “सोशल मीडियावर अशा गोष्टी प्रसिद्ध केल्या जात आहेत, जे कपडे मी आयुष्यात कधी परिधानही केले नाही आहेत.” तिचे म्हणणे आहे की या गोष्टींचा प्रभाव सरळ तिच्या Career वरही होतो. तिच्या कामात अडथळा आणतो. जान्हवी सांगते की, “जर एखाद्या सिनेमात मी दिग्दर्शकाला सांगितले की या कपड्यात मी कम्फर्टेबल नाहीये आणि जर त्या दिग्दर्शकाच्या नजरेत कधी सोशल मीडियावरचे माझे Morphed Photos आले असतील तर नक्कीच तो व्यक्ती हाच विचार करेल की हिने तर असे कपडे घालून आधी बरेच Photoshoot केले आहेत.”
अभिनेत्रीचे म्हणणे आहे की तिला या गोष्टींचा नेहमी त्रास होतो पण आपल्याकडे एक म्हणणे आहे की “आपल्याला आयुष्यात खूप काही मिळालं आहे तर थोडं सहनही करावं.”