Kushal Badrike–Atharva Sudame Controversy (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरे कुशल बद्रिके आणि अथर्व सुदामे यांच्यामध्ये सध्या कांदे-पोह्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. कुशल बद्रिकेने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत अथर्व सुदामेवर गंभीर आरोप केला होता. घरी बोलावून कांदे-पोहे न देणे हा पाहुणचाराचा अपमान आहे, असे कुशल म्हणाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आता या सगळ्या वादावर अथर्व सुदामेने स्वतः पुढे येऊन उत्तर दिले आहे.
अथर्वने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ टाकला आहे. त्या व्हिडिओत तो अगदी नम्रपणे माफी मागताना दिसतो. तो म्हणाला, “मित्रांनो नमस्कार, मी हा व्हिडिओ खास माफी मागण्यासाठी बनवला आहे. मी खरंच सगळ्या कलाकारांना घरी बोलावलं होतं, पण मला त्यांना साधे कांदे-पोहे पण देता आले नाहीत. त्यामुळे कलाकार माझ्यावर नाराज झाले, आणि तुम्ही लोक पण मला बोललात की सुदामे असं करणं बरोबर नाही. घरी बोलावून कांदे-पोहे न देणं हे चुकीचं आहे.”
त्यावर उपाय म्हणून अथर्वने एक भारी शक्कल लढवली आहे. तो म्हणाला, “म्हणून मी आता ‘सुदाम्यांचे कांदे पोहे’ नावाचाच एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम फक्त कलाकारांसाठी नाहीये, तर माझ्या सगळ्या चाहत्यांसाठी आहे. 9 नोव्हेंबरला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. याला यायचं असेल तर तुम्हाला तिकीट घ्यावं लागेल.” या पोस्टनंतर अथर्वच्या चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतले आहे. कमेंटमध्ये लोक म्हणत आहेत की, आता नक्की जाऊन कांदे-पोहे खाणार.
Kushal Badrike on Atharva Sudame: ‘व्हिडीओवर अपमान करता तोपर्यंत …
खरं तर कुशल बद्रिकेने तो व्हिडिओ रागातून बनवला होता. तो म्हणाला होता, “नमस्कार, हा व्हिडिओ मी आजपर्यंत कधीच बनवला नव्हता, कारण असा वाईट अनुभव मला कधीच आला नव्हता. अथर्व सुदामेने आम्हा सगळ्या कलाकारांना सांगितले की माझ्याकडे कांदे-पोह्यांचा कार्यक्रम आहे, घरी या. आम्ही पण आनंदाने गेलो, चला सुदाम्याचे फेमस कांदे-पोहे खायला मिळतील. पण तिथे गेल्यावर कळले की एकालाही कांदे-पोहे मिळालेच नाहीत.
View this post on Instagram
“तो पुढे म्हणाला, “तू तुझ्या व्हिडिओत लोकांची मजा घेतोस, रोस्ट करतोस, ते एकवेळ ठीक आहे. पण घरी बोलावून अशा प्रकारे अपमान करणे मला पटले नाही. तुला माझा आक्षेप आहे.” असे बोलून कुशलने व्हिडिओ संपवला होता. नंतर वाद वाढताना दिसताच कुशलने तो व्हिडिओ डिलीट पण केला.
आता लोकांना वाटतंय की हे सगळं आधीपासून ठरलेलं होतं का? कारण भांडण ज्या कांदे-पोह्यावरून झालं, त्याच नावाने शो काढणे, हा एक प्रकारचा प्रमोशन स्टंट असू शकतो. असो, पण 9 नोव्हेंबरचा शो आता हिट होणार हे मात्र नक्की.
Ans: अथर्वने कलाकारांना घरी बोलावूनही कांदे-पोहे न दिल्यामुळे कुशलने नाराजी व्यक्त केली होती.
Ans: त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितली.
Ans: बातमीनुसार, हा कार्यक्रम 9 नोव्हेंबरला होणार आहे.






