Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharmendra Pradhan : ‘आता सुरुवात झालीये!’ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, हेमंत ढोमेची पोस्ट; तरुणांना केले आवाहन ‘मागं हटायचं…’

शिक्षणातील समस्या आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर विद्यार्थ्यांनी देशभर तीव्र आंदोलने केली होती. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 25, 2026 | 03:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • जर पंतप्रधान मोदींनी यावर पाऊले उचलली नाहीत तर त्यांची खुर्चीही धोक्यात असेल.”
  • सल्ला देण्यास तसेच त्यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे.
  • कॅप्शनची सुरुवातही “मेरे युवा साथीयो…” अशीच ठेवली असावी.
अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे नेहमी सामाजिक विशयानावरे आपले मत मांडत असतो. गेल्या काही दिवसात देशामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण सुव्यवस्थेसाठी देशभरात आंदोलने केली. सोनम वांगचुक विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी उपोषणावर बसले होते. 26 व्या दिवशी त्यांनी उपोषण मागे घेतले. अशामध्ये CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की “जरी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले असले तरी आपण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाशिवाय मागे हटणार नाही आहोत. जर पंतप्रधान मोदींनी यावर पाऊले उचलली नाहीत तर त्यांची खुर्चीही धोक्यात असेल.”

Akanksha Puri On CJP Protest: “आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे दिले जात आहेत,” अभिनेत्रीच्या धक्कादायक दाव्याने देशभरात खळबळ

सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्याच्या दोन दिवसात धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. त्यांच्या मागण्यांची पूर्तता झाली असून आंदोलनाला यश मिळाले आहे. अशामध्ये या आंदोलनाला मनोरंजनसृष्टीतील अनेक कलावंतांनीही पाठिंबा दर्शवला होता. अखेर त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे, त्यामुळे प्रयत्नशील कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवाहन करण्यास, सल्ला देण्यास तसेच त्यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे.

अभिनेता हेमंत ढोमेने देखील याविषयावर विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे पसंत केले होते. अखेर, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याने आंदोलनाला यश आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक करत हेमंत ढोमेने पोस्ट करत त्यांना सांगितले आहे की, “मेरे युवा साथीयो… आता सुरुवात झालीये, आता मागे हटायचं नाही.” या कॅप्शनखाली त्याने धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट केलेले त्यागपत्र पोस्ट केले आहे. या त्यागपत्रात धर्मेंद्र प्रधानांनी सुरुवात “मेरे युवा साथीयो…” अशीच केली होती, त्यामुळे हेमंतने त्याच्या कॅप्शनची सुरुवातही “मेरे युवा साथीयो…” अशीच ठेवली असावी.

Pach Futacha Bachchan Movie: ‘पाच फुटाचा बच्चन’मध्ये दडलेलं रहस्य काय? ‘राम कृष्ण हरी’च्या गजरात उलगडणार अनोखी कथा

जेव्हा CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांना माध्यमांनी विचारले होते की “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन आपल्या हाती लागणार आहे?” तेव्हा अभिजीत म्हणाले होते की, “याने मोठ्या पदावर बसलेल्या मंडळींच्या मनामध्ये भीती बसेल की आपण जर असे वागलो तर प्रश्न आपल्या खुर्चीवरही येऊ शकतो.” याच उद्देशाने हेमंत ढोमेने पोस्ट शेअर करत त्यावर “आता सुरुवात झालीये, आता मागे हटायचं नाही.” असे नमूद केले आहे! एकंदरीत, काही चुकीचे भासल्यास असेच एकत्र येऊन लढा द्या, असे त्याचे म्हणणे आहे.

Web Title: Hemant dhome gave message to all the students after the resignation of dharmendra pradhan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 03:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.