
फोटो सौजन्य - Social Media
मराठी सिनेमा जागतिक व्यासपीठावर दाखवण्यात येणार आणि ते पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून, विविध देशातून आलेले Filmmakers मंडळी तेथे उपस्थित असणार. या समारोहात दोन मराठी चित्रपटांना दाखवण्यात येणार आहे. एकंदरीत, काही दोन मराठी सिनेमे मराठी सिनेसृष्टीला, मुख्यतः महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर करणार आहे. मुळात, मराठी सिनेमांना जागतिक व्यासपीठ मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे मराठी चित्रपटांचे प्रदर्शन विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये केले जाते. यंदा, Cannes Film Festival 2026 मध्ये ‘जीव’ तसेच ‘एप्रिल मे 99’ या दोन मराठी चित्रपटांचे प्रदर्शन केले जाणार आहे.
Cannes Film Festival 2026 मध्ये 15 मे 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता पॅलेस B येथे ‘एप्रिल मे 99’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. दिग्दर्शक रोहन म्हापुसकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात आर्यन मेंघजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर आणि नवोदित साजिरी जोशी झळकले आहेत. चार मित्रांची कथा आणि त्यांचं Pre Digital युगामधील जीवन, कसं होतं? या गोष्टींचा उत्तम नमुना या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
Cannes Film Festival 2026 मध्ये 16 मे 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता पॅलेस B येथे ‘जीव’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. जीव हा चित्रपट आदिवासी कोकणी संस्कृतीवर आधारित आहे. या सिनेमातून एका विशिष्ट संस्कृतीचे जीवन दाखवण्यात आले आहे.